शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

गिर्यारोहक ऊली स्टेक यांचा नेपाळच्या मोहिमेत अपघाती मृत्यू

By admin | Updated: May 2, 2017 19:41 IST

रविवारी सकाळी ८ च्या सुमारास एव्हरेस्ट शिखर परिसरातील नूपतसे (उंची ७८६१ मीटर्स) या शिखरावर चढाई करताना अपघाती मृत्यू झाला

आॅनलाइन लोकमतकाठमांडू, दि. २ - जगप्रसिद्ध गियार्रोहक ऊली स्टेक (वय ४१) यांचा रविवारी सकाळी ८ च्या सुमारास एव्हरेस्ट शिखर परिसरातील नूपतसे (उंची ७८६१ मीटर्स) या शिखरावर चढाई करताना अपघाती मृत्यू झाला. यावर्षीच्या २०१७ वर्षीच्या एव्हरेस्ट चढाईच्या मोसमामधील हा पहिला मृत्यू ठरला आहे.ऊली स्टेक हे स्वित्झर्लंड या देशाचे होते. नेपाळमधल्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ऊली स्टेक हे त्यांची २०१७ वषार्तील महत्वाकांक्षी मोहीम म्हणजेच जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट (८८५० मीटर्स) आणि जगातील चौथे उंच शिखर माऊंट लोहत्से (८५१६ मीटर्स) या दोनही शिखरांवर नव्या मार्गाने चढाई करण्याची मोहीम पूर्ण करण्यासाठी नेपाळमध्ये आले होते. या मोहिमेच्या तयारीसाठी ते गेले २ महिने माऊंट एव्हरेस्टच्या परिसरातील वेगवेगळ्या शिखरांवर चढाई करत होते. या तयारीचा भाग म्हणून आणि वातावरणाशी समरस होण्यासाठी ३० एप्रिल रोजी सकाळी नूपतसे या शिखरावर त्यांनी चढाईला सुरुवात केली. चढाई करताना त्यांचा पाय घसरून साधारण ३००० फूट खोल नूपतसे शिखराच्या तळाशी पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह सोमवारी काठमांडूमध्ये आणला गेला.कोण आहेत ऊली स्टेक...ऊली स्टेक हे जगातल्या सर्वोत्तम गिर्यारोहकांपैकी एक असे होते. गिर्यारोहणाला त्यांनी त्यांच्या कामगिरीमधून एका वेगळ्या उंचीवर नेले होते. ते त्यांच्या स्पीड क्लायंबिंग आणि तंत्रशुद्ध क्लायंबिंगसाठी जगप्रसिद्ध होते. गिर्यारोहणामध्ये स्पीड क्लायंबिंगची संकल्पना त्यांनी सर्वप्रथम आणली. स्पीड क्लायंबिंगमधले अनेक विक्रम त्यांच्या नावावर आहेत. वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी गिर्यारोहण क्षेत्रामध्ये पाऊल ठेवले आणि त्यानंतर एका मागोमाग एक अशा अनेक दर्जेदार मोहिमा त्यांनी एकट्याने (सोलो) पूर्ण केल्या. त्यांनी केलेल्या मोहिमांमध्ये विशेष उल्लेख करता येतील, यात माऊंट एंगर नॉर्थ फेस (३९७० मीटर्स, स्वित्झर्लंड), मॅटरहॉर्न नॉर्थ फेस (४४७८ मीटर्स, स्वित्झर्लंड), माऊंट एव्हरेस्ट (८८५० मीटर्स, नेपाळ), माऊंट अन्नपूर्णा साऊथ फेस (८०९१ मीटरर्स, नेपाळ) अशा उल्लेखनीय मोहिमा आहेत. त्यांना गिर्यारोहणामधले अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये २००८ मध्ये माऊंट एंगर स्पीड क्लायंबिंगसाठी अवॉर्ड, २०१४ मध्ये माऊंट अन्नपूर्णा साऊथ फेसची चढाई एकट्याने विक्रमी वेळेमध्ये यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल गिर्यारोहणामधला मानाचा पायलट डॉक्टर हा पुरस्कार त्यांना मिळाला आहेत. गिरीप्रेमीच्या पुणे एव्हरेस्ट २०१२ आणि लोहत्से एव्हरेस्ट २०१३ या दोन्ही मोहिमेमधल्या गिर्यारोहकांना या महान गिर्यारोहकाशी या मोहिमांच्या दरम्यान संवाद साधता आला. त्याच्या चढाईचे कौशल्य, गिर्यारोहणाबद्दल असणारे विचार इत्यादी गोष्टी अनुभवता आल्या. यावर्षी २०१७ मध्ये एव्हरेस्ट मोहिमेसाठी गेलेल्या गिरीप्रेमीच्या उमेश झिरपे यांच्याशी त्यांनी गिर्यारोहण आणि त्याबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन, माऊंट एव्हरेस्टच्या चढाईमधली आव्हाने इत्यादी बद्दल चर्चा केली होती. ज्येष्ठ गिर्यारोहक सर ख्रिस बोनिन्गटन यांनी ऊली स्टेकला श्रद्धांजली देताना आजपर्यंतच्या गिर्यारोहकांमधला महान आणि सर्वोत्तम गिर्यारोहक असे उद्गार काढले आहेत. ऊली स्टेकच्या अशा अचानक जाण्यामुळे गिर्यारोहण जगतामध्ये शोककळा पसरली आहे आणि त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी हीं कधीही न भरून येणारी आहे.