शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

एक्स्प्रेस-वेवर कारला अपघात (मुख्य अंकासाठी)

By admin | Updated: December 20, 2015 23:56 IST

माडपजवळ घडली घटना : दोन महिलांसह तीन महिन्यांच्या बालकाचा मृत्यू

माडपजवळ घडली घटना : दोन महिलांसह तीन महिन्यांच्या बालकाचा मृत्यू
खालापूर : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत माडपजवळ रविवारी दुपारी आय-२० कारला झालेल्या भीषण अपघातात दोन महिलांसह तीन महिन्याच्या बालकाचा मृत्यू झाला. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून गुजरात राज्यातील सुरतमधील हे कुटुंब फिरण्यासाठी महाराष्ट्रात आले होते. पुण्यावरून मुंबईला जात असताना चालकाचे भरधाव वेगातील कारवरील नियंत्रण सुटल्याने कार डाव्या बाजूला जावून झाडावर आदळली. या अपघातातील जखमींवर कळंबोली येथील एम.जी.एम. रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृतीही चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सुरत येथे राहणारे प्रणव पटेल (३२) आपल्या कुटुंबासह महाराष्ट्रात फिरण्यासाठी आले होते. पुणे येथून पटेल आपल्या कुटुंबासह जी.जे. ०५ जे.डी. ४२५१ या क्र मांकाच्या आय-२० कारने मुंबईकडे जात असताना खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत माडप व कुंभिवली गावाच्या दरम्यान भरधाव वेगातील कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार डाव्या बाजूला असलेल्या झाडावर जावून धडकली. यामध्ये अंजू पटेल (३२), दिना सिंग (४३) या दोन महिला जागेवरच ठार झाल्या तर या अपघातात पूर्व पटेल या तीन महिन्याच्या बालकाचाही मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये प्रणव पटेल व मनीष जयंतीलाल (३२) हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृतीही चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या अपघाताची नोंद खालापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस निरीक्षक विकास रामुगडे पुढील तपास करीत आहेत.(वार्ताहर)
फोटो २० खालापूर ऑक्सीडेंट