खारपाडा पुलावर अपघात; एक ठार चार गंभीर : मुंबई - गोवा महामार्गावर १० तास वाहतूक कोंडी
By admin | Updated: February 1, 2016 00:03 IST
पेण : मुंबई - गोवा महामार्गावर खारपाडा ब्रीजवर रविवारी पहाटे ४.३० च्या सुमारास पिकअप व्हॅनला टँकरची धडक बसून एक जण ठार झाला, तर चौघे गंभीर जखमी झाले. पेण पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुुरू आहेत.
खारपाडा पुलावर अपघात; एक ठार चार गंभीर : मुंबई - गोवा महामार्गावर १० तास वाहतूक कोंडी
पेण : मुंबई - गोवा महामार्गावर खारपाडा ब्रीजवर रविवारी पहाटे ४.३० च्या सुमारास पिकअप व्हॅनला टँकरची धडक बसून एक जण ठार झाला, तर चौघे गंभीर जखमी झाले. पेण पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुुरू आहेत. या भीषण अपघातात टँकर पुलावरच पलटी झाला. पिकअप व्हॅनमधील प्रकाश सोनू सोलकर (रा. खेतवाडी, मुंबई) याचा मृत्यू झाला तर चंद्रकांत पाटील (४६, रा. खेतवाडी), महेश धनराज मोडे (२३, रा. नेरूळ), कोमल जयंत येले (२४), हंस जयंत येले (४, रा. विरार) गंभीर जखमी झाले. पुलाच्या मध्यभागीच अपघात झाल्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूंकडील वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे महामार्गावरची वाहतूक पेण - खोपोली मार्गावरून वळविण्यात आली. सुटीचा दिवस असल्याने कोकणात जाणार्यांची व पर्यटकांची गर्दी होती. अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साहाय्याने पुलाच्या कडेला आणून ठेवल्यानंतर वाहतूक सुरू झाली. तब्बल १० तासांनी दुपारी २.०० वाजता वाहतूक कोंडी दूर करण्यात पोलिसांना यश आले. (वार्ताहर)फोटो - ३१पेण ॲक्सिडेंट (भालचंद्र जुमलेदार)