शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
3
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
4
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
5
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
6
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
7
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
8
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
9
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
10
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
11
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
12
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
13
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
14
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
15
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
16
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
17
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
18
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
19
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
20
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?

सुविधा नसलेल्या महाविद्यालयांचे प्रवेश रोखणार

By admin | Updated: May 7, 2014 21:46 IST

पुढील शैक्षणिक वर्षापासून या महाविद्यालयांचे प्रवेश रोखण्याबाबत विद्यापीठाने उपाययोजना कराव्यात, अशी चर्चा नुकत्याच झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत करण्यात आली.

पुणे: पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या 79 महाविद्यालयांमध्ये सुमारे दहा वर्षांपासून एकाही मान्यता प्राप्त प्राध्यापक व प्राचार्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी या महाविद्यालयातून मिळत नाहीत. त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षापासून या महाविद्यालयांचे प्रवेश रोखण्याबाबत विद्यापीठाने उपाययोजना कराव्यात, अशी चर्चा नुकत्याच झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत करण्यात आली.विद्यापीठाशी संलग्न असलेल्या 79 महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली होती. तब्बल 10 वर्षांहून अधिक काळ उलटून गेला तरीही काही महाविद्यालयांनी एकाही मान्यताप्राप्त प्राध्यापकाची नियुक्ती करून घेतली नाही. त्यामुळे संबंधित महाविद्यालयांचे प्रवेश थांबविण्याबाबत शिक्षण वर्तुळात चर्चा सुरू होती. शासनानेही या महाविद्यालयांबाबत विद्यापीठाने योग्य निर्णय घ्यावा, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत या प्रश्नावर विस्तृतपणे चर्चा झाली.विद्यापीठाच्या महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ.व्ही.बी.गायकवाड म्हणाले,मान्यता प्राप्त प्राध्यापकांची नियुक्ती न केलेल्या महाविद्यालयांना विद्यापीठाने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यातील ब-याच महाविद्यालयांनी उत्तर पाठविले आहेत. आता महाविद्यालयाकडून विद्यापीठाला प्राप्त झालेल्या पत्रांची छाणणी केली जाईल. तसेच किती महाविद्यालयांनी प्राध्यापकांची नियुक्ती केली नाही याची तपासणी केली जाईल आणि हा अहवाल विद्यापरीषदेसमोर ठेवला जाईल.त्यानंतर संलग्नता काढून घेण्याची कार्यवाही करता येईल.