रणजीत भोईटे यांच्या खुनातील फरार आरोपीस अटक
By admin | Updated: May 18, 2016 00:46 IST
जळगाव: माजी नगरसेवक रणजीत भोईटे यांच्या खुनात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पॅरोलवर बाहेर येऊन फरार झालेल्या जयंत उर्फ जयेश अभिमन्यू सोनवणे (रा.कोळन्हावी ता.यावल) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी अटक केली. सोनवणे हा २०१४ पासून पॅरोल रजेवर होता, मात्र ही रजा संपल्यानंतर तो कारागृहात हजर झाला नाही, याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा आरोपी जळगाव शहरात असल्याची माहिती मिळाल्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे राजेंद्र पाटील, शरीफोद्दीन काझी, सुधाकर अंभोरे, संजय मुरलीधर पाटील व दीपक शिरसाठ यांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेऊन यावल पोलिसांच्या ताब्यात दिले.
रणजीत भोईटे यांच्या खुनातील फरार आरोपीस अटक
जळगाव: माजी नगरसेवक रणजीत भोईटे यांच्या खुनात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पॅरोलवर बाहेर येऊन फरार झालेल्या जयंत उर्फ जयेश अभिमन्यू सोनवणे (रा.कोळन्हावी ता.यावल) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी अटक केली. सोनवणे हा २०१४ पासून पॅरोल रजेवर होता, मात्र ही रजा संपल्यानंतर तो कारागृहात हजर झाला नाही, याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा आरोपी जळगाव शहरात असल्याची माहिती मिळाल्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे राजेंद्र पाटील, शरीफोद्दीन काझी, सुधाकर अंभोरे, संजय मुरलीधर पाटील व दीपक शिरसाठ यांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेऊन यावल पोलिसांच्या ताब्यात दिले.फोटो...