शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अबब! निवडणुकांवर ३, ४२६ कोटींचा खर्च

By admin | Updated: May 15, 2014 04:21 IST

देशात लोकशाही मजबूत व्हावी यासाठी निवडणूका निष्पक्ष व शांततेत पार पाडण्याची मोठी जबाबदारी निवडणूक आयोगावर असते.

नवी दिल्ली : देशात लोकशाही मजबूत व्हावी यासाठी निवडणूका निष्पक्ष व शांततेत पार पाडण्याची मोठी जबाबदारी निवडणूक आयोगावर असते. यंदा मात्र ही जबाबदारी पार पाडण्यासाठी केंद्र शासनाला खर्च करावा लागला आहे तो थोडाथोडका नव्हे तर चक्क ३ हजार ४२६ कोटी रुपयांचा. २००९ च्या तुलनेत यंदाच्या निवडणूकांच्या खर्चात चक्क १३१ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. देशातील आतापर्यंतच्या निवडणूकांमधील खर्चाचा ‘रेकॉर्ड’ यंदा मोडल्या गेला आहे. २००९ साली झालेल्या लोकसभा निवडणूकांमध्ये १ हजार ४८३ कोटी रुपयांचा खर्च झाला होता. नऊ टप्प्यांमध्ये झालेल्या यंदाच्या निवडणूकांत केंद्र शासन, राजकीय पक्ष व उमेदवारांनी मिळून एकत्रितपणे जवळपास ३० हजार कोटींचा खर्च केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी यंदा निवडणूक आयोगाने विशेष प्रयत्न केले होते. मतदार जागृती मोहीम, मतपत्रिकांचे वाटप आणि प्रथमच वापरण्यात आलेली ‘व्हीव्हीपॅट’ मशीनच्या सहाय्याने ‘पेपर आॅडीट’ करण्याची प्रणाली यामुळे यंदाच्या शासकीय खर्चात वाढ झाली आहे. यंदा अनेक नवीन राजकीय पक्ष तसेच अपक्ष उमेदवार निवडणूकांच्या रिंगणात होते. यंदा उमेदवारांची प्रचारखर्च मर्यादा ४० लाखांहून ७० लाख इतकी करण्यात आली होती. जास्त उमेदवार असल्याने सहाजिकच खर्च वाढणे अपेक्षितच होते असे मत निवडणूक आयोगातील सूत्रांनी व्यक्त केले आहे. १९५२ साली झालेल्या निवडणूकांमध्ये प्रति मतदार ६० पैशांचा खर्च आला होता. ५७ वर्षांनंतर २००९ साली हाच आकडा १२ रुपये प्रति मतदार इतका पोहोचला. निवडणूकांसाठी होणारा सर्व शासकीय खर्च केंद्र सरकारकडून करण्यात येतो. परंतु कायदा व सुव्यवस्था नियंत्रित करणे ही स्थानिक राज्य शासनाची जबाबदारी असते.