शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

अभिजित कोळपे बातमी : ढमाले मळा येथे बिबट्या जेरबंद

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

नागरिकांची गर्दी : माणिकडोह निवारण केंद्रात बिबट्या दाखलमढ : ढमाले मळा येथे वनविभागाकडून शुक्रवारी लावण्यात आलेल्या पिंजर्‍यात बिबट्या (मादी) रात्री साडेनऊच्या सुमारास पिंजर्‍यात अडकला. या वेळी बिबट्या पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.उदापूरचे वनरक्षक एस. जी. मोमीन यांनी सांगितले, की उदापूर, मांदारणे, अहिनवेवाडी, गोटीशीवार, सारणी या परिसरात वारंवार दुचाकीचालकांवर बिबट्याकडून हल्ले ...


नागरिकांची गर्दी : माणिकडोह निवारण केंद्रात बिबट्या दाखल
मढ : ढमाले मळा येथे वनविभागाकडून शुक्रवारी लावण्यात आलेल्या पिंजर्‍यात बिबट्या (मादी) रात्री साडेनऊच्या सुमारास पिंजर्‍यात अडकला. या वेळी बिबट्या पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
उदापूरचे वनरक्षक एस. जी. मोमीन यांनी सांगितले, की उदापूर, मांदारणे, अहिनवेवाडी, गोटीशीवार, सारणी या परिसरात वारंवार दुचाकीचालकांवर बिबट्याकडून हल्ले होत होते. त्यामुळे वनविभागाकडून पाहणी करून पिंजर्‍याची जागा वारंवार बदलली जात असे. त्यानुसारच गुरुवारी (दि. १२) ढमाले मळा येथे रात्री बिबट्याने हल्ला केल्याने शीतल जगताप या जखमी झाल्या होत्या. त्यामुळे वनविभागकडून ढमाले मळा येथे पाहणी करून शुक्रवारी (दि. १३) नितीन अहिनवे यांच्या शेतात पिंजरा लावून त्यात सावज म्हणून मेंढी ठेवली होती. त्याच रात्री साडेनऊला बिबट्या पिंजर्‍यात अडकल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्यानुसार वनपाल एस. बी. महाले, एस. डी. वायभासे, सी. एस. कांबळे, एन. एम. खताळ व वनरक्षक एस. मोमीन, सी. नलावडे, के. एस. नायकोडी, जाधव, पारधी, केदार, गुफेकर, गंवादे घटनास्थळी पोहोचले.
या बिबट्यास माणिकडोह येथील बिबट्या निवारण केंद्रात रात्रीच हलवण्यात आले. बिबट्या मादी जातीचा असून बिबट्याचे बछडे तेथेच फिरत असावेत, म्हणून परत त्या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला आहे. ढमाले मळा ‘ा ठिकाणी पिंजर्‍यात अडकलेला बिबट्या अंदाजे चार वर्षांचा असावा, असे वनविभागातर्फे सांगण्यात आले.

चौकट
आतापर्यंत तीन महिला जखमी
सुनीता गणेश महाकाळ, बाळासाहेब बबन महाकाळ, शीतल जगताप यांना या परिसरात बिबट्याने आतापर्यंत जखमी केले होते. त्यामुळे उदापूर, ढमाले मळा, मांदारणे, अहिनवेवाडी, सारणी, गोटीशिवार या परिसरात बिबट्याची दहशत होती.

वनविभागाचे नागरिकांकडून अभिनंदन
गुरुवारी रात्री एका महिलेवर बिबट्याने हल्ला केला. त्या स्थळाची पाहणी करून शुक्रवारीच पिंजर्‍याची जागा बदलली व त्याच रात्री बिबट्या जेरबंद झाला. त्यामुळे नागरिकांकडून वनविभागाचे अभिनंदन केले जात आहे.

फोटो ओळी : पिंजर्‍यात कैद झालेला बिबट्या (मादी).