शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

अभिजित कोळपे बातमी : पुणे-जेजुरी रेल्वे शटल सुरू करा

By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST

जिमाची मागणी : जेजुरी औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांची बैठकजेजुरी : तीर्थक्षेत्र जेजुरी येथे असलेल्या औद्योगिक वसाहत उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त व सुरक्षित आहे. येथे देशभरातून उद्योग आले पाहिजेत, असा प्रयत्न जिमाचा असून वसाहतीच्या प्रगतीसाठी पुणे-जेजुरी रेल्वे शटल सेवा सुरू व्हावी, अशी मागणी सुभाष देसाई यांच्यामार्फत केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे ...


जिमाची मागणी : जेजुरी औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांची बैठक
जेजुरी : तीर्थक्षेत्र जेजुरी येथे असलेल्या औद्योगिक वसाहत उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त व सुरक्षित आहे. येथे देशभरातून उद्योग आले पाहिजेत, असा प्रयत्न जिमाचा असून वसाहतीच्या प्रगतीसाठी पुणे-जेजुरी रेल्वे शटल सेवा सुरू व्हावी, अशी मागणी सुभाष देसाई यांच्यामार्फत केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे, अशी माहिती जिमाचे अध्यक्ष डॉ. रामदास कुटे यांनी दिली. त्याचा पाठपुरावा संघटनेच्या माध्यमातून करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जेजुरी औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांची शुक्रवारी संघटनेच्या नियोजित सभा झाली. अध्यक्षस्थानी उद्योजक संघटनेचे (जेजुरी इंडस्ट्रियल मॅन्यु. असोसिएशन) जिमाचे संस्थापक बी. एम. ताकवले होते. बैठकीला डॉ. रामदास कुटे, औद्योगिक वसाहतीचे क्षेत्रीय अधिकारी राजेंद्र भोसले, उपभियंता संजय कुलकर्णी, महावितरणचे एम. एन. रॉय, बी. एस. एन. एल.चे बाळासाहेब जाधव, बँक ऑफ महाराष्ट्र, सुवर्णयुग बँक आदी बँकांचे अधिकारी, नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष गणेश आगलावे, जिमाचे पदाधिकारी व उद्योजक रवी जोशी, पांडुरंग सोनवणे, राजेश पाटील, शकिल शेख, अंकुश सोनवणे आदींसह ८० सदस्य उपस्थित होते.
वसाहतीत मोठ्या उद्योजकांनी लहान उद्योग टिकविण्यासाठी सहकार्याची भावना ठेवावी. येणार्‍या अडी-अडचणी सोडविण्यासाठी उद्योजकांनी संघटनेत सहभागी व्हावे. कारखान्याचा परिसर स्वच्छ ठेवावा; तसेच वृक्षसंवर्धनाकडे लक्ष द्यावे, नवीन येणार्‍या उद्योजकांना सहकार्य करावे, आपापल्या कारखान्यातील कामगारांचे हित जोपासावे, तसेच जिमाच्या नव्याने बांधण्यात येत असलेल्या सभागृहाच्या इमारतीसाठी मदत करावी, असे आवाहन बी. एम. ताकवले यांनी केले आहे.
जेजुरी पोलिस ठाण्याचे स. पो. नि. रामदास शेळके यांच्या योग्य नियोजनामुळे वसाहतीत कायदा आणि सुव्यवस्था राखली जात आहे. त्यांचे कारखानदारांना सहकार्य व मार्गदर्शन असते. म्हणून त्यांचे विशेष ठरावाद्वारे अभिनंदन करण्यात आले आहे. रवी जोशी यांनी सूत्रसंचालन केले. पांडुरंग सोनवणे यांनी आभार मानले.

फोटो ओळ : जिमाच्या बैठकीत उद्योजकांना मार्गदर्शन करताना डॉ. रामदास कुटे.
०००००