शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

अभिजित कोळपे बातमी : जात वैधता प्रमाणपत्रासाठी सहा महिन्यांची मुदत वाढ

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

ग्रामपंचायत निवडणूक : शासनाच्या निर्णयाचे ग्रामस्थांकडून स्वागत

ग्रामपंचायत निवडणूक : शासनाच्या निर्णयाचे ग्रामस्थांकडून स्वागत
राजेगाव : राज्य मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र देण्याची मुभा सहा महिने केली आहे. निवडणुकीमध्ये लढणार्‍या राखीव प्रवर्गातील हजारो उमेदवारांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.
आतापर्यंत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी उमेदवारांना अर्जासोबतच जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक होते. मात्र, राज्य मंत्रिमंडळात नुकत्याच घेण्यात आलेल्या या निर्णयाचे तालुक्यातील ग्रामस्थांमधून स्वागत करण्यात आले आहे.
दौंड तालुक्यामध्येही सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू झालेली आहे. तालुक्यातील राजेगाव, नायगाव, स्वामी चिंचोली, वरवंड, पाटस, पारगाव, गार या गावात अनुसूचित जमाती या प्रवर्गातील ठाकर, पारधी, भिल्ल, महादेव कोळी या जातीचे लोक राहत असल्यामुळे त्या-त्या गावात संबंधित प्रवर्गाचे प्रतिनिधी निवडून दिले जातात. या लोकांना जातीचे दाखले मिळतात; परंतु जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी फार अडचणीला तोंड द्यावे लागते. ज्या कोणाकडे जात वैधता प्रमाणपत्र आहे, त्यांतील बहुतांशी लोक सरकारी नोकरीला असल्याने त्यांना निवडणुकीसाठी उभे राहता येत नाही. त्यामुळे एक तर या प्रवर्गातील जागा रिक्तच राहतात अथवा निवडणुकीनंतर जात वैधता प्रमाणपत्राअभावी सदस्यत्व रद्द होते. निवडणूक झाल्यानंतर काही गावांत स्थानिक गटतट व बेरजेचे राजकारण यांमुळे कोणीही हरकत न घेतल्याने जात वैधता प्रमाणपत्र नसले तरी पाच वर्षे सदस्यत्व कायम राहिल्याची उदाहरणेही काही गावांत पाहायला मिळतात.

(चौकट)
प्रमाणपत्र देण्यासाठी जाणीवपूर्वक बिलंब
पि›म महाराष्ट्र ठाकर संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब लोंढे यांच्या मागणीनुसार ६ महिन्याची मुदत फार कमी आहे. कारण, पुणे येथील आदिवासी संशोधन समिती सहा महिन्यांत अनेक तांत्रिक बाबी उपस्थित करून जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी जाणीवपूर्वक बिलंब लावते. त्यामुळे निवडून आलेल्या सदस्याचे सदस्यत्व रद्द होऊन त्याच्यावर अन्याय होत असल्याचे मत लोंढे यांनी व्यक्त केले.

विशेष मोहीम सहा महिने अगोदरच राबवावी
राजेगावचे माजी उपसरपंच प्रवीण लोंढे म्हणाले, की निवडणूक असलेल्या गावामध्ये जातीचे दाखले देण्याची विशेष मोहीम सहा महिने अगोदरच राबविली पाहिजे. त्यामुळे ऐन निवडणुकीत अडचण येणार नाही व जात वैधता प्रमाणपत्राअभावी त्या प्रभागातील पद रिक्त राहणार नाही.