शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

आमिरने भारताची प्रतिमा मलीन केली

By admin | Updated: January 19, 2016 13:23 IST

असहिष्णूतेबाबत वक्तव्य करून आमिरने देशाची प्रतिमा मलिन केली' असे सांगत 'अतुल्य भारत' कॅम्पेनमागचा प्रमुख चेहरा असलेल्या अमिताब कांत यांनी आमिरच्या हकालपट्टीचे समर्थन केले.

ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. १९ - देशातील असहिष्णूतेबद्दल वक्तव्य केल्यामुळे अभिनेता आमिर खानला 'अतुल्य भारत' मोहमेच्या ब्रँड अँम्बेसेडरपदावरून काढण्यात आल्याच्या निर्णयावरून बरीच उलट-सुलट चर्चा होत आहे. मात्र ' असहिष्णूतेबाबत वक्तव्य करून आमिरने देशाची प्रतिमा मलिन केली' असे सांगत या मोहिमेमागील प्रमुख चेहरा असलेले औद्योगिक धोरण आणि प्रसार विभागाचे  (DIPP - इंडस्ट्रीयल पॉलिसी अँड प्रमोशन डिपार्टमेंट) सचिव अमिताभ कांत यांनी आमिरच्या हकालपट्टीचे समर्थन केले आहे. सोमवारी अहमदाबादमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते. 
' ब्रँड अँम्बेसेडर हा एखाद्या ब्रँडचे प्रमोशन करत असतो. भारत हा अतुल्य आहे असा प्रसार जर या मोहिमेच्या ब्रँड अँम्बेसडरने केला तरच परदेशातील पर्यटकांचा भारताकडे ओढा वाढेल. पण जर देशाचा ब्रँड अँम्बेसेडरच भारत असहिष्णू असल्याचे वक्तव्य करत असेल तर तो त्याचे नेमून दिलेले काम व्यवस्थित करत नाही, हे स्पष्ट होते ' असे कांत यांनी सांगितले. ' आमिरने या देशाची ओळख, प्रतिमा मलीन केली आहे. त्याचे वक्तव्य ऐकल्यानंतर इतर देशातील नागरिक भारतात येणार नाही. ब्रँड अँम्बेसेडरचे काम हे त्या ब्रँडचा प्रसार करणे असते, त्याची ओळख नष्ट करणे नव्हे' असे नमूद करत कांत यांना आमिरच्या हकालपट्टीचे समर्थनच केले. 
पत्नी किरण राव हिने आपण देश सोडून जावे का? अशी विचारणा केल्याचे सांगत आमीरने देशात असहिष्णुता वाढल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. देशातील असुरक्षित वातावरणात मुलांच्या सुरक्षेबाबत भीती वाटत असल्याची भावनाही त्याने व्यक्त केली होती. मात्र त्याच्या या वक्तव्यानंतर देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या, अनेकांनी त्याला देश सोडून जाण्याचा सल्लाही दिला होता. त्याचे हे वक्तव्य त्याला भलतेच महागात पडले. देशातील पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्रालयातर्फे चालवण्यात येणा-या 'अतुल्य भारत' या कॅम्पेनच्या ब्रँड अँम्बेसडर पदावरून त्याला काढून टाकण्यात आले. त्यावर ' सरकारकडून देशासाठी जे सर्वोत्तम असेल, त्याचदृष्टीने पुढची पावलं उचलली जातील अशी मला खात्री आहे. तसेच, मी ब्रॅण्ड अॅम्बेसडर नसलो तरी आपला देश हा अतुल्यच राहणार' असे आमिरने म्हटले होते.