शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

पठाणकोटवरून ‘आप’, भाजपमध्ये रणकंदन

By admin | Updated: April 6, 2016 04:44 IST

पठाणकोट दहशतवादी हल्ल्यासंदर्भात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारवर बुधवारी तिखट हल्ला चढवला. दुसरीकडे केजरीवालांच्या ६ आरोपांपैकी ३ आरोपांचे भाजपने

नवी दिल्ली : पठाणकोट दहशतवादी हल्ल्यासंदर्भात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारवर बुधवारी तिखट हल्ला चढवला. दुसरीकडे केजरीवालांच्या ६ आरोपांपैकी ३ आरोपांचे भाजपने पत्रकार परिषदेत खंडन केले. दिल्लीत बुधवारी पठाणकोटवरून आप व भाजपमधे धुमश्चक्री पाहायला मिळाली. केजरीवाल म्हणाले, पाकच्या संयुक्त चौकशी पथकाने पठाणकोट हल्ला हे भारताने घडवलेले नाट्य होते, अशी प्रतिक्रिया नोंदवली. या पथकाच्या दौऱ्यातून काय साध्य झाले, असा सवाल करून मोदी आणि नवाज शरीफ यांच्यात नेमके काय डील झाले, ते देशाला समजलेले नाही. हल्ला चढवणाऱ्यांकडूनच केंद्राने तपास व चौकशीची अपेक्षा केल्याने देशाची फसगतच झाली. त्यासाठी मोदींनी देशाची माफी मागितली पाहिजे.केजरीवालांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देतांना दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्याय म्हणाले, केजरीवाल आणि आपच्या मंत्र्यांना राज्यघटनेविषयी कोणताही आदर नाही, हे वारंवार सिध्द झाले आहे. आपच्या कपिल मिश्रांनी व्टीटरवर पाकच्या अहवालावर मोदी गप्प का? पंतप्रधान मोदींइतका आयएसआयचा मोठा एजंट कोणी आहे काय?’ अशी भडक प्रतिक्रिया नोंदवली होती. त्यावर उपाध्याय म्हणाले, केजरीवाल व त्यांचे मंत्री पंतप्रधानांना आयएसआय एजंट संबोधतात. देशाला शरमेने मान खाली घालायला लावणारी ही घटना आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)