अजब बंगल्याला दोन सुरक्षा रक्षक
By admin | Updated: July 30, 2015 23:14 IST
नागपूर : पोलीस आयुक्तांनी संत्रानगरीतील प्रसिद्ध मध्यवर्ती संग्रहालय (अजब बंगला) येथे दोन सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत. ही व्यवस्था तात्पुरती असून कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी राज्य शासनाला आठ आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका प्रलंबित आहे. मध्यवर्ती संग्रहालयात सोन्याचांदीचे अनेक मौल्यवान दागिने व पुरातन कलाकृती आहेत. असे असतानाही संग्रहालयात काहीच सुरक्षा व्यवस्था नाही. यामुळे संग्रहालयातील मौल्यवान कलाकृती धोक्यात आहेत. कधीही अनुचित घटना घडण्याची शक्यता आहे ही बाब न्यायालयाच्या निदर्शनात आणून देण्यात आली होती. न्यायालयाने अजब बंगल्याच्या दूरवस्थेची स्वत:च दखल घेऊन जनहित याचिका दाखल केली आहे. ॲड. देवेंद्र चव्हाण न्यायालय मित्र आहेत.