शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आधार कार्ड बनवणाऱ्या १ हजार आॅपरेटर्सच्या सेवा तडकाफडकी रद्द

By admin | Updated: April 9, 2017 20:37 IST

युनिक आयडेंटीफिकेशन अ‍ॅथॉरीटी आॅफ इंडिया (युआयडीएआय) ने आधार कार्ड तयार करणाऱ्या १ हजार आॅपरेटर्सच्या सेवा बंद

सुरेश भटेवरा / ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली,दि.9 - युनिक आयडेंटीफिकेशन अ‍ॅथॉरीटी आॅफ इंडिया (युआयडीएआय) ने आधार कार्ड तयार करणाऱ्या १ हजार आॅपरेटर्सच्या सेवा बंद करण्याचा आदेश जारी केला आहे. इतकेच नव्हे तर या सर्वांवर १0 हजार रूपयांचा दंडही ठोठावला आहे.

आधार कार्ड तयार करण्यासाठी कोणतीही फी आकारली जात नाही. तरीही या आॅपरेटर्सनी अवाजवी फी आकारल्याचा आरोप आहे. आधार कार्डबाबत सरकार आग्रही असतांना विविध ठिकाणाहून या तक्रारी प्राप्त झाल्याने युआयडीएआयने ही धडक कारवाई केली. या संदर्भात बोलतांना युआयडीएआयचे सीईओ अजयभूषण पांडे म्हणाले, आधार कार्ड बाबत कोणी कोणतीही हेराफेरी केली तर झिरो टॉलरन्स हे आमच्या विभागाचे धोरण आहे. डिसेंबर २0१६ पासून आजतागायत आम्ही १ हजार असे आॅपरेटर्स शोधून काढले आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून आमच्या व्यवस्थेतून त्यांना आम्ही हद्दपार करून टाकले. देशात कोणत्याही भागात हे आॅपरेटर्स आता आधार कार्डाची नोंदणी करू शकणार नाहीत.

पूर्वीच्या आधार कार्डची माहिती अपडेट करण्यासाठी युआयडीएआयने २५ रूपये फी निश्चित केली आहे. तथापि काही आॅपरेटर्स यासाठी देखील अधिक पैसे आकारीत असल्याच्या तक्रारी युआयडीएआयकडे पोहोचल्या आहेत. ठरलेल्या दरापेक्षा अधिक रक्कम आकारणाऱ्या आॅपरेटर्सना ताकीद देण्यात आली असून गंभीर स्वरूपाच्या तक्रारींबाबत एफआयआर देखील नोंदवण्यात आल्या आहेत.