शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

‘आधार’ने प्राप्तिकर रिटर्न भरले, तरी ‘पॅन’ नंबर स्वत:हून देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 06:35 IST

सरकार आपणहून करणार व्यवस्था

नवी दिल्ली : ‘पॅन कार्ड’ व ‘आधार कार्ड’ परस्परांना पर्याय म्हणून वापरता येतील, अशी घोषणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडताना केली असली, तरी प्राप्तिकराचे रिटर्न भरण्यासाठी ‘पॅन कार्ड’ आता इतिहासजमा झाले, असे समजू नका. जे करदाते फक्त ‘आधार’ नंबर देऊन रिटर्न भरतील, त्यांच्यासाठी प्राप्तिकर विभाग स्वत:हून ‘पॅन’ नंबर तयार करून दोन्हींची जोडणी करणार आहे.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (सीबीडीटी) अध्यक्ष प्रमोद चंद्र मोदी यांनी ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. ते म्हणाले, वित्तमंत्र्यांच्या घोषणेनंतर आता ‘पॅन’ नंबर इतिहासजमा होईल, असे म्हणणे चुकीचे ठरेल. ‘पॅन’ व ‘आधार’ची परस्परांशी जोडणी हे कायदेशीर बंधन आहे व त्याचे पालन यापुढेही होतच राहील.

‘पॅन’ व ‘आधार’साठी एकाच प्रकारची माहितीलागत असल्याने ‘आधार’ नंबर मिळाल्यावर त्या व्यक्तीला ‘पॅन’ नंबरही विनासायास दिला जाऊ शकतो. एखाद्याने ‘पॅन’ घेतले नसले तर त्यास ‘पॅन’ देणे आवश्यक आहे, असे वाटल्यास स्वत:हून ते देण्याचा अधिकार प्राप्तिकर अधिकाऱ्यांना आहे. शिवाय ज्यांच्याकडे १ जुलै २०१७ या तारखेला ‘पॅन’ आहे व जे ‘आधार’ घेण्यास पात्र आहेत अशा प्रत्येकाने ‘आधार’ क्रमांक कर विभागास देणेही बंधनकारक आहे.आधी होईल जोडणी, मग भरता येईल रिटर्नमोदी म्हणाले की, ‘पॅन’नंबर नसलेल्यांना प्राप्तिकर रिटर्न भरण्यात अडचण येऊ नये यासाठी दिलेली ही जास्तीची सुविधा आहे. करदात्याने केवळ ‘आधार’ नंबर टाकून रिटर्न भरले तरी करनिर्धारण अधिकारी स्वत:च्या अधिकारात करदात्यासाठी एक स्वतंत्र ‘पॅन’ नंबर देईल. ‘पॅन’व ‘आधार’ची तो स्वत:हून जोडणी करेल व त्यानंतरच रिटर्न भरण्याची पूर्ण होईल.