शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कुंभारीत ९० टक्के महिला, मुलींचे हिमोग्लोबीन कमी संजीवनी बी़ फार्मसीच्या शिबिरातून पुढे आला प्रकार

By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST

कोपरगाव : तालुक्यातील कुंभारी येथे १०३० महिला व मुलींच्या रक्तातील हिमोग्लोबीनची तपासणी करण्यात आली़ वैद्यकीय शास्त्रानुसार महिलांच्या रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण १२ ते १४ ग्रॅम/डेली आवश्यक असते़ परंतु ९० टक्के महिलांमध्ये हे प्रमाण दहा गॅ्रम/ डेली पेक्षाही कमी असल्याचे आढळून आले़ हा प्रकार संजीवनी बी़ फार्मसी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबीरातून पुढे आला़

कोपरगाव : तालुक्यातील कुंभारी येथे १०३० महिला व मुलींच्या रक्तातील हिमोग्लोबीनची तपासणी करण्यात आली़ वैद्यकीय शास्त्रानुसार महिलांच्या रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण १२ ते १४ ग्रॅम/डेली आवश्यक असते़ परंतु ९० टक्के महिलांमध्ये हे प्रमाण दहा गॅ्रम/ डेली पेक्षाही कमी असल्याचे आढळून आले़ हा प्रकार संजीवनी बी़ फार्मसी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबीरातून पुढे आला़
संजीवनी बी़ फार्मसी महाविद्यालय आयोजित कुंभारी येथे राष्ट्रीय सेवा योजनांतर्गत हिवाळी शिबिराची सांगता संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली झाली़ यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून तहसीलदार इंदिरा चौधरी, प्राचार्य संजय आरोटे उपस्थित होते़
कार्यक्रम अधिकारी प्रा़ रावसाहेब शेंडगे यांनी सप्ताह काळात राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली़ व्यसनमुक्ती, स्त्री भू्रणहत्या, महिला सबलीकरण आदी विषयांवर गावकर्‍यांचे प्रबोधन केले़ या शिवाय १२०० पुरूष व महिलांचे रक्तगट तपासून देण्यात आले़ एक हजार ३० महिला व मुलींच्या रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण तपासण्यात आले़ यात ९० टक्के महिलांच्या रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी असल्याचे आढळून आले. बी़ फार्मसीच्या विद्यार्थिनींनी हिमोग्लोबीन कमी असणार्‍या मुली व महिलांना आहाराविषयी घ्यावयाची काळजी व मार्गदर्शन केले़
शिबीराचे उद्घाटन पंचायत समितीचे सभापती सुनील देवकर यांच्या हस्ते झाले़ यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष विजय नायडू, ग्रामविकास अधिकारी आऱ आय़ पटेल, सरपंच मथुरार्बा कबाडी, उपसरपंच शिवाजीराव घुले, भाऊसाहेब गोडगे उपस्थित होते़