शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर काश्मीरमध्ये 90 दहशतवादी कार्यरत - मुनीर खान

By admin | Updated: May 23, 2017 17:32 IST

जम्मू-काश्मीरच्या उत्तरेकडील भागात जवळपास 90 दहशतवादी कार्यरत असल्याची माहिती काश्मीरचे पोलीस महासंचालक मुनीर खान यांनी मंगळवारी दिली.

ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 23 - जम्मू-काश्मीरच्या उत्तरेकडील भागात जवळपास  90 दहशतवादी कार्यरत असल्याची माहिती काश्मीरचे पोलीस महासंचालक मुनीर खान यांनी मंगळवारी दिली. 
आमच्याकडे माहिती आहे की, दहशतवादी काश्मीरच्या उत्तरेकडील भागात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, या भागात अद्याप दहशतवाद्यांची घुसखोरी वाढण्यासंदर्भात कोणताही अहवाल आमच्याकडे नाही, असे पोलीस  महासंचालक मुनीर खान यांनी सोपोर येथे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. येथील बारामुल्ला परिसरातून दहशतवाद्यांचा घुसखोरी करण्याचा पारंपारिक मार्ग राहिला आहे. मला तुम्हाला सांगण्यास आनंद होत आहे की, या भागात दहशतवाद्यांशी लढण्यास लष्कर समर्थ असून त्याप्रकारे काम सुरु आहे, असेही यावेळी मुनीर खान म्हणाले.
दरम्यान, गेल्या आठवड्यात जम्मू- काश्मीरमधील नौगाम नियंत्रण रेषेवरील दहशतवादी आणि लष्कर यांच्यात झालेल्या भीषण चकमकीत लष्कराच्या जवानांनी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. मात्र, यामध्ये लष्कराचे तीन जवानही हुतात्मा झाले. काही दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत होते. सतर्क सुरक्षा जवानांनी त्यांचा प्रयत्न उधळल्यानंतर ही चकमक उडाली होती. या चकमकीत लष्कराच्या जवानांनी दहशतवाद्यांकडून चार शस्त्रे आणि इतर वस्तू जप्त केली होती. 
दुसरीकडे, नियंत्रण रेषेवरील कुरापती काढणा-या पाकिस्तानला लष्कराने चांगलाच धडा शिकवला आहे. जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीला मदत करणा-या पाकिस्तानी चौक्या भारतीय लष्कराने कारवाई करुन उद्ध्वस्त केल्या आहेत.
पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत करणा-या चौक्या लष्कराने तोफगोळयाच्या वर्षाव करुन उद्ध्वस्त केल्या. दहशतवादविरोधी रणनितीअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. सीमेवर घुसखोरीला मदत करणा-या पोस्टसवर वेळोवेळी अशा प्रकारची कारवाई केली जाते अशी माहिती मेजर नरुला यांनी दिली आहे.