शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
2
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
3
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
4
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
5
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
6
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
7
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
8
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
9
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
10
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
11
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
12
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
13
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
14
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
15
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
16
Ganesh Visarjan 2025: बाप्पा दीड दिवसांतच का चालला? असं चिमुकल्यांनी विचारलं, तर द्या 'हे' शास्त्रोक्त उत्तर!
17
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
18
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
19
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
20
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम

९७ टक्के बाद नोटा जमा

By admin | Updated: January 6, 2017 02:34 IST

काळा पैसा बाहेर काढण्यासाठी चलनातून बाद करण्यात आलेल्या पाचशे आणि हजाराच्या नोटांपैकी ९७ टक्के नोटा बँकांत जमा झाल्या आहेत.

नवी दिल्ली : काळा पैसा बाहेर काढण्यासाठी चलनातून बाद करण्यात आलेल्या पाचशे आणि हजाराच्या नोटांपैकी ९७ टक्के नोटा बँकांत जमा झाल्या आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या महत्त्वाकांक्षी मोहिमेच्या यशाबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. ब्लुमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार, ३0 डिसेंबरपर्यंत देशातील विविध बँकांत पाचशे आणि हजाराच्या १४.९७ लाख कोटी रुपयांच्या नोटा जमा झाल्या आहेत. चलनात असलेल्या एकूण नोटांच्या तुलनेत हे प्रमाण ९७ टक्क्यांपेक्षाही जास्त आहे. काळ्या पैशाच्या स्वरूपात साठवून ठेवलेल्या नोटा बँकांत जमा होणार नाही, असा सरकारचा अंदाज होता. तथापि, तसे काही झालेले नाही.आर्थिक आघाडीवर नोटाबंदीचा मोठा फटका देशाला बसला असल्याची माहिती सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) या संस्थेने दिली आहे. डिसेंबरला संपलेल्या तिमाहीत गुंतवणुकीत मोठी घट झाली आहे. १,२५,000 कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव या काळात आले. त्याआधी मोदी सरकारच्या काळातील ९ तिमाहीत सरासरी २,३६,000 कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव आले होते, असे सीएमआयईने म्हटले आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीचा मुद्दा ‘नोटाबंदी’उत्तर प्रदेशसह पाच राज्यांत होत असलेल्या निवडणुकांत नोटाबंदी हाच प्रमुख मुद्दा राहाणार आहे. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. तथापि, त्यावरून सरकार टीकेचे लक्ष्य ठरले आहे. त्यामुळे विरोधक नोटाबंदीचा विषय घेऊन केंद्र सरकारवर आणि मोदींवर टीकेची झोड उठवतील, तसेच भाजपा या निर्णयाचे समर्थन करण्याचा प्रयत्न करताना दिसेल. पाचही राज्यांमध्ये होणाऱ्या जाहीर सभांमधून काळा पैसा, धनाढ्य, गरीब जनता यांचेच मुद्दे घेऊन नोटाबंदी गाजण्याची शक्यता आहे. पहिल्या सहामाहीत वृद्धिदर ७ टक्के राहाणारनोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेला फटका बसणार असल्याचा अंदाज अनेक अर्थतज्ज्ञ व्यक्त करत असताना, सरकारने चांगल्या वृद्धिदराची अपेक्षा ठेवली आहे. २0१७-१८ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत वृद्धिदर ७ टक्के राहील, असे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले. तथापि, जानेवारी ते मार्च या काळात तो ४ टक्क्यांपर्यंत घसरू शकतो. अर्थतज्ज्ञ मात्र वेगळ्या मताचे आगामी वित्त वर्षात भारताचा वृद्धिदर ६.५ टक्के ते ७ टक्क्यांपर्यंत खाली घसरेल. छोट्या उद्योगांनी मोठ्या प्रमाणात कामगार कपात केली आहे. ग्राहक वस्तूंची मागणी घटली आहे. रबी हंगामातील पेरणी घटली आहे. याचा फटका अर्थव्यवस्थेला बसेल.