शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ९ ठार, पुन्हा हिंसाचार उसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2023 11:46 IST

दहा जखमी; लष्कर व निमलष्करी दलाचे जवान तैनात

इम्फाळ : मणिपूरमधील खामेनलोक भागातील एका गावामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात नऊ जण ठार व दहा लोक जखमी झाले आहेत. मैतेई जमातीची बहुसंख्या असलेला इम्फाळ पूर्व जिल्हा व कांगपोकी या आदिवासी जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कुकी जमातीच्या गावाला मंगळवारी रात्री उशिरा दहशतवाद्यांनी वेढा दिला. त्यावेळी दहशतवादी व गावकऱ्यांमध्ये झालेल्या गोळीबारात नऊ जण ठार झाले. मात्र, या घटनेनंतर इम्फाळ पूर्व व इम्फाळ पश्चिम जिल्ह्यांमध्ये प्रशासनाने संचारबंदी शिथिल करण्याचा कालावधी कमी केला आहे. मणिपूरमधील १६ जिल्ह्यांपैकी ११ जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे.

मणिपूरमध्ये मैतेई व कुकी जमातींमध्ये गेल्या महिनाभरातील हिंसाचारात १००हून अधिक लोकांचा मृत्यू व ३१०पेक्षा अधिक जण जखमी झाले. या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी लष्कर व निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. मैतेई जमातीचा अनुसूचित जमातींमध्ये समावेश करण्यात यावा, या मागणीसाठी ३ मे रोजी मणिपूरमध्ये विविध जिल्ह्यांत मोर्चे काढण्यात आले होते. त्यानंतर या राज्यात हिंसाचाराचा भडका उडाला.

या राज्यात शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे काही दिवसांपूर्वी मणिपूरच्या दौऱ्यावर गेले होते. त्यांनी तेथील परिस्थितीचा आढावा घेतला होता. हिंसक कारवाया करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला होता. त्यानंतर काही काळ मणिपूरमध्ये शांतता होती; पण आता पुन्हा हिंसक घटना घडल्या. (वृत्तसंस्था)

‘डबल इंजिन’चे सरकार अपयशी का ठरले?

मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यात भाजपचे डबल इंजिन सरकार अपयशी का ठरत आहे, असा सवाल काँग्रेसने विचारला आहे. त्या राज्यातील परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन बाळगले आहे. तेथील स्थितीचा आढावा घेण्यासाठी मोदी यांनी एक बैठकही घेतली नाही, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारterroristदहशतवादी