शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

राजकीय पक्षांना मिळाल्या ९५६.७७ कोटींच्या देणग्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 05:38 IST

राष्ट्रीय पातळीवरील राजकीय पक्षांना कंपन्यांनी २०१२-२०१३ आणि २०१५-२०१६ या चार वर्षांत ९५६.७७ कोटी रुपयांच्या देणग्या दिल्या.

नवी दिल्ली : राष्ट्रीय पातळीवरील राजकीय पक्षांना कंपन्यांनी २०१२-२०१३ आणि २०१५-२०१६ या चार वर्षांत ९५६.७७ कोटी रुपयांच्या देणग्या दिल्या. ज्ञात स्रोतांकडून दिल्या गेलेल्या एकूण देणग्यांपैकी ८९ टक्के भाग हा भाजपला (७०५.८१ कोटी रुपये) मिळाला. राष्ट्रीय पक्षांमध्ये भाजपला २,९८७ कंपन्यांकडून सर्वात जास्त म्हणजे ७०५.८१ कोटी रुपयांची देणगी मिळाली. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला १६७ कंपन्यांकडून १९८.१६ कोटी रुपये मिळाले, असे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (एडीआर) गुरुवारी येथे सांगितले. निवडणूक आयोगाकडे राजकीय पक्षांनी जी माहिती सादर केली त्याचा यासाठी आधार घेण्यात आला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ५०.७३ कोटी, मार्क्सवादी पक्षाला १.८९ कोटी आणि ०.१८ कोटी रुपये भाकपला मिळाले. या अहवालात बहुजन समाज पक्षाचा विश्लेषणासाठी विचार करण्यात आलेला नाही.२०१२-२०१३ आणि २०१५-२०१६ वर्षांत पाच राष्ट्रीय पक्षांनी २० हजार रुपयांच्या वर स्वेच्छेने देणगीच्या माध्यमातून १,०७०.६८ कोटी रुपये मिळवले. यातील ८९ टक्के देणगी (९५६.७७ कोटी रुपये) कंपन्या/उद्योजकांकडून मिळाली, असे एडीआरने म्हटले.एडीआरने यापूर्वी दिलेल्या अहवालानुसार वेगवेगळ्या व्यावसायिकांनी ३७८.८९ कोटी रुपयांची देणगी राष्ट्रीय पक्षांना दिली. त्यातील ८७ टक्के देणगी ही आर्थिक वर्ष २००४-२००५ आणि २०११-२०१२ मध्ये ज्ञात स्रोतांकडून मिळालेली होती.२० हजार रुपयांपेक्षा अधिक देणगी देणाºया देणगीदारांची माहिती निवडणूक आयोगाला देणे राजकीय पक्षांना बंधनकारक आहे. या अहवालात म्हटले आहे की, २०१२-१३ आणि २०१५-१६ या आर्थिक वर्षात कॉर्पोरेट/व्यावसायिक घराण्यांकडून भाजप आणि काँग्रेसला देण्यात आलेल्या २० हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या देणग्यांचे प्रमाण अनुक्रमे ९२ टक्के आणि ८५ टक्के आहे. माकपा आणि भाकपाला मिळालेल्या देणग्यांचे प्रमाण सर्वात कमी म्हणजे ४ टक्के आणि १७ टक्के आहे. राष्ट्रीय पक्षांनी लोकसभा निवडणुका झालेल्या वर्षात म्हणजे २०१४-१५ मध्ये मोठ्या प्रमाणात देणग्या स्वीकारल्या.सत्य इलेक्ट्रॉल ट्रस्टने २०१२-१३ आणि २०१५-१६ या काळात ३५ वेळा देणग्या दिल्या आहेत. त्यांनी एकूण २६०.८७ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. यात भाजपने १९३.६२ कोटी, तर काँग्रेसने ५७.२५ कोटी रुपये देगणी स्वीकारली होती.दरम्यान, २०१२-१३ या काळात रिअल इस्टेट क्षेत्राने १६.९५ कोटी रुपयांच्या देणग्या राष्ट्रीय पक्षांना दिल्या. भाजपने १४ प्रमुख क्षेत्रांकडून देणग्या स्वीकारल्या. यात रिअल इस्टेट (१०५.२० कोटी), बांधकाम क्षेत्र, निर्यात, आयात (८३.५६ कोेटी), केमिकल्स, फार्मास्युटिकल्सकडून (३१.९४ कोटी) रुपये स्वीकारले. एकूण १,९३३ देणग्यांमधून राष्ट्रीय पक्षांनी ३८४.०४ कोटी रुपये स्वीकारले. पॅन व पत्ता आदी माहिती नसलेल्या १५९.५९ कोटी रुपयांच्या देणग्यांतील ९९ टक्के देणग्या भाजपशी संबंधित आहेत.