शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
3
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
4
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
5
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
6
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
7
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
8
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
9
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
10
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
11
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
12
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
13
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
14
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
15
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
16
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
17
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
18
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
19
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
20
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!

82 वर्षांचा इसम 10वीत तब्बल 47व्यांदा झाला नापास

By admin | Updated: June 21, 2016 15:31 IST

राजस्थानमध्ये राहणारे ८२ वर्षी शिवचरण यांनी ४७ व्यांदा १०वीची परीक्षा दिली मात्र ते पुन्हा नापास झाले.

ऑनलाइन लोकमतराजस्थान, दि. 20- कोणत्याही परीक्षेत नापास झाल्यास किंवा अपयश आल्यास माणसाच्या प्रयत्नांत खंड पडतो, असं नेहमीच पाहायला मिळतं. मात्र राजस्थानातल्या जयपूरमध्ये एका ८२ वर्षांच्या इसमाने तब्बल 47 वेळा 10वीची परीक्षा दिली आणि मात्र दुर्दैवाने ते पुन्हा नापासच झाले.  राजस्थानपासून 140 किलोमीटरवरील बहरोड भागातल्या कोहारी गावात राहणारे शिवचरण हे शिवजीराम नावानंही परिचित आहेत. हे महाशय दहावीच्या परीक्षेत तब्बल 47 वेळा नापास झाले आहेत. विशेष म्हणजे जोपर्यंत 10वीच्या परीक्षेत पास होत नाही तोपर्यंत आपण लग्न करणार नसल्याची त्यांनी प्रतिज्ञा केली आहे. त्यामुळे 82 वर्षीय शिवचरण यांच्यावर अद्याप अविवाहित असून यंदाही नापास झाल्याने त्या अजून वर्षभर तरी अविवाहीतच राहावे लागेल असे दिसते.स्वतःच्या प्रतिज्ञेशी प्रामाणिक राहत शिवचरण यांनी अजून लग्न केलेलं नाही. शिवचरण यांनी आपली उमेद अजूनही सोडलेली नाही. त्यामुळे त्यांच्या परिस्थितीवर वाईट वाटून घ्यावं की त्यांच्या जिद्दीला सलाम करावा, याची आता सगळीकडे चर्चा आहे.

शिवचरण यादव हे वाड-वडिलांच्या काळापासून असलेल्या घरात एकटेच राहतात. यंदा १० मार्चपासून राज्यात सुरू झालेल्या दहावीच्या परीक्षेत ते यशस्वी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. १९६८ साली त्यांनी पहिल्यांदा दहावीची परीक्षा दिली, मात्र त्यावर्षी ते नापास झाले. तेव्हापासून असंच सुरू आहे, ते एका वर्षी काही विषयांत उत्तीर्ण होतात,  पण त्यांचे इतर काही विषय अडकतात. जर गणित आणि विज्ञानात चांगले गुण मिळाले तर  ते हिंदी आणि इंग्रजीत नापास होत असत. सुमारे २५ वर्षांपूर्वी म्हणजे १९९५ साली ते दहावीची परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अगदीच नजीक पोहोचले होते. त्यावर्षी  ते  जवळजवळ सर्व विषयांमध्ये उत्तीर्ण झाले, पण नेमका गणितात नापास झालो. पण तरीही त्यांनी प्रयत्न करणं सोडलं नाही. गेल्या ३० वर्षांपासून ते त्यांच्या पूर्वजांच्या घरात एकटेच रहात आहेत. सरकारतर्फे वृद्धांना देण्यात येणारे पेन्शन आणि शेजारील मंदिरातून मिळणार प्रसाद यावर त्यांनी आत्तापर्यंत गुजारण केली.