काटोल तालुक्यातील ८२ घरांची पडझड
By admin | Updated: August 14, 2015 22:54 IST
काटोल तालुक्यातील ८२ घरांची पडझड
काटोल तालुक्यातील ८२ घरांची पडझड
काटोल तालुक्यातील ८२ घरांची पडझडकाटोल : दोन दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे काटोल तालुक्यातील ८२ घरांची पडझड झाल्याची माहिती तहसीलदार सचिन गोसावी यांनी दिली. पावसामुळे तालुक्यातील १६ गावांमधील ८२ घरांचे अर्थात ३ लाख ६१ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. वाढोणा येथील माला शामराव तायवान व मेंडकी येथील फत्तूदेव आप्पा यांची घरे जमीनदोस्त झाली. सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही, असेही गोसावी यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)***