शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमधील ८० टक्के मतदार पैसे घेऊन मतदान करण्यास राजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2015 12:44 IST

बिहारमधील ८० टक्के लोकांना मतदानासाठी पैसे किंवा भेटवस्तू स्वीकारण्यात काहीच गैर वाटत नसल्याचे बिहारच्या निवडणुक आयुक्तांनी केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

ऑनलाइन लोकमत 

पाटणा, दि. ७ - बिहारमधील ८० टक्के लोकांना मतदानासाठी पैसे किंवा भेटवस्तू स्वीकारण्यात काहीच गैर वाटत नसल्याचे बिहारच्या निवडणुक आयुक्तांनी केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. या सर्वेक्षणानंतर बिहारच्या निवडणूक आयोगाने आमीषाला बळी न पडता मतदान करावे यासाठी विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. 

बिहार निवडणूक आयोगाने जनतेमधील मतदानाविषयीचा दृष्टीकोन जाणून घेण्यासाठी पाटण्यातील चंद्रगुप्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या सहकार्याने सर्वेक्षण केले आहे. जून - जुलै २०१५ याकालावधीत सुमारे ४,५०० जणांची मतं या सर्वेक्षणात जाणून घेण्यात आली.  यामध्ये ८० टक्के लोकांनी मतदानासाठी पैसे किंवा भेटवस्तू स्वीकारण्यात गैर नसल्याचे सांगितले.  निवडणूक आयोगानेही या सर्वेक्षणाची दखल घेतली मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी विशेष मोहीम राबवली आहे. रेडिओ, वृत्तपत्र व प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आमीषाला बळी न पडता मतदान करा असे आवाहन केले जात आहे.  २०१० मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीत ५२.६७ टक्के मतदारांनी मतदान केले होते. तर लोकसभा निवडणुकीत हे प्रमाण ५६.२८ टक्क्यांवर पोहोचले होते. २०१० च्या विधानसभा निवडणुकीत मतदार राज्याबाहेर असल्याने मतदानाचे प्रमाण कमी होते. याशिवाय मतदान केंद्रावरील लांबच लांब रागांमुळेही मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली होती. यंदा मतदानादरम्यान दिवाळीची सुट्टी असल्याने मतदार गावी परततील आणि मतदानाचे प्रमाण वाढेल अशी आशा वर्तवली जात आहे.