शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

8 लाख नव्या कोऱ्या गाड्या जाणार भंगारात

By admin | Updated: March 30, 2017 05:01 IST

बीएस-चार (भारत स्टेज-फोर) उत्सर्जन निकषांचे पालन न करणाऱ्या वाहनांची विक्री आणि नोंदणीवर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक एप्रिलपासून

 नवी दिल्ली :  बीएस-चार (भारत स्टेज-फोर) उत्सर्जन निकषांचे पालन न करणाऱ्या वाहनांची विक्री आणि नोंदणीवर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक एप्रिलपासून देशभर बंदी घातली आहे. तसे निर्देश सरकारला दिले. या बंदीमुळे देशभरात तयार असणाऱ्या आणि नोंदणी न झालेल्या जवळपास आठ लाख नव्या कोऱ्या गाड्या भंगारात जाण्याची शक्यता आहे. स्वयंचलित वाहनांच्या उत्पादकांच्या व्यावसायिक हितापेक्षा लक्षावधी लोकांच्या आरोग्याचे फार फार महत्व आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. न्यायमुर्ती (पान ११ वर) कंपन्यांकडील साठाकंपन्यांकडे सध्या ९६,७२४ व्यावसायिक वाहने, सहा लाख ७१ हजार ३०८ दुचाकी, ४० हजार ४८ तीनचाकी आणि १६,0९८ कार्स अशी आठ लाख २४ हजार २७५ वाहने आहेत31/12/2016पासून बीएस-४ च्या दुचाकी व व्यावसायिक वाहनांच्या साठ्यात वेगाने वाढ झाली आहे याचा अर्थ असा की वाहन उत्पादकांनी बीएस-४ चे उत्पादन वाढवले आहे, असे या तज्ज्ञाने म्हटले.बीएस-४चे उत्पादन वाढवले सध्या बाजारात बीएस-४ चे निकष पूर्ण करणाऱ्या 14.7लाख दुचाकी व 39646 व्यावसायिक  वाहने आहेत, असे या क्षेत्रातील तज्ज्ञाने सांगितले.याचा अर्थ असा की बाजारात आज बीएस-३ निकषांच्या दुचाकींच्या साठ्यापेक्षा बीएस-४ निकषांच्या दुचाकींचा साठा दुपटीपेक्षा जास्त आहे तसेच बीएस-४ चा व्यावसायिक वाहनांचा साठा बीएस-३ च्या न विकल्या गेलेल्या वाहनांच्या अर्ध्यापेक्षा जास्त आहे. न्यायालयाने सुनावलेबीएस-चार निकष एक एप्रिलापासून अमलात येणार आहेत हे माहीत असतानाही उत्पादकांनी बीएस-४ च्या निकषांनुसार वाहनांच्या उत्पादनासाठी कृती न केल्याबद्दल न्यायालयाने त्यांची कानउघडणी केली.सरकारने वाहन उत्पादकांची बाजू घेऊन सध्याचा बीएस-३ वाहनांचा साठा विकण्यास परवानगी द्यावी अशी विनंती केली परंतु न्यायालयाने ती फेटाळली. नवे उत्सर्जन निकष २००५ व २०१० मध्ये सक्तीचे केले गेल्यानंतर जुना वाहनांचा साठा विकण्यास परवानगी दिली गेल्याचे सरकारने न्यायालयाच्या निदर्शनास आणले होते.जुने तंत्रज्ञान असलेल्या वाहनांच्या उत्पादनाला बंदी असली तरी सध्याचा वाहनांचा साठा विकण्यास ती नाही, असे सरकारने सांगितल्यानंतरही खंडपीठाने बीएस-३ वाहने रस्त्यावर आणण्यास परवानगी दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले.