शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे 8 लाख 24 हजार 278 गाडया जाणार भंगारात

By admin | Updated: March 29, 2017 16:07 IST

उत्पादकांच्या व्यावसायिक हितापेक्षा लाखो नागरीकांचे आरोग्य महत्वाचे आहे असे न्यायमूर्ती मदन बी लोकूर आणि न्यायामूर्ती दीपक गुप्ता यांनी आदेश देताना सांगितले.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 29 - सर्वोच्च न्यायालयाने कार उत्पादक कंपन्यांना मोठा झटका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने येत्या 1 एप्रिलपासून BS-III इंजिनावर चालणा-या गाडयांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. उत्पादकांच्या व्यावसायिक हितापेक्षा लाखो नागरीकांचे आरोग्य महत्वाचे आहे असे न्यायमूर्ती मदन बी लोकूर आणि न्यायामूर्ती दीपक गुप्ता यांनी आदेश देताना सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे लाखो गाडया भंगारात गेल्या आहेत. येत्या 1 एप्रिलपासून BS-IV उत्सर्जनाचे नियम एप्रिलपासून लागू होणार  आहेत. 
 
सरकारने 31 मार्चनंतर प्रदूषण वाढवणा-या BS III गाडयांच्या नोंदणीला परवानगी देऊ नये असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. BS-IV उत्सर्जनाचे नियम एप्रिलपासून लागू होणार हे कंपन्यांना माहित होते तरीही त्यांनी BS III तंत्रज्ञान बदलून  BS-IV नुसार गाडयांचे उत्पादन करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत असे कोर्टाने म्हटले आहे. 
 
केंद्राने यावेळी कार उत्पादक कंपन्यांची बाजू मांडली. कंपन्यांकडे स्टॉकमध्ये असलेल्या BS III गाडया विकण्याची परवानगी द्यावी अशी विनंती सरकारने केली पण न्यायालयाने सरकारची याचिका फेटाळून लावली. यापूर्वी 2005 आणि 2010 मध्ये उत्सर्जनाचे नवीन नियम लागू झाले त्यावेळी कंपन्यांना त्यांच्या स्टॉकमध्ये असलेली वाहने विकण्याची परवानगी दिली होती याकडे सरकारने लक्ष वेधले. 
 
BS-III इंजिनावरील गाडयांचा देशभरातील स्टॉक 
- ट्रक-अवजड वाहने – 96 हजार 724 
- कार – 16 हजार 198
-  तीन चाकी – 40 हजार 048
- दुचाकी – 6 लाख 71 हजार 308