शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूर हिंसाचारात ८ ठार, ३१ जखमी

By admin | Updated: September 2, 2015 00:11 IST

मणिपूर विधानसभेत सोमवारी काही वादग्रस्त विधेयके मंजूर झाल्यानंतर चुडाचंदपूर जिल्ह्यात भडकलेला हिंसाचार आणि पोलिसांच्या गोळीबारात ८ जण ठार तर ३१जखमी झाले

इम्फाल : मणिपूर विधानसभेत सोमवारी काही वादग्रस्त विधेयके मंजूर झाल्यानंतर चुडाचंदपूर जिल्ह्यात भडकलेला हिंसाचार आणि पोलिसांच्या गोळीबारात ८ जण ठार तर ३१जखमी झाले. या घटनेमुळे शहरात बेमुदत संचारबंदी लागू करण्यात आली. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी मंगळवारी मुख्यमंत्री ओ. इबोबी सिंग यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली आणि केंद्रातर्फे सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.राज्यात मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळून आला असून, राज्य सरकारमधील एक मंत्री, खासदार आणि पाच आमदारांच्या घरांना अज्ञात लोकांनी आग लावली. चुडाचंदपूर शहरात मंगळवारी तीन मृतदेह आढळले. त्यांना गोळ्या घालण्यात आल्या होत्या. तर हेंगलपचे आमदार मंगा वेईफेई यांच्या निवासस्थानाच्या मलब्यातून एक जळलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली. मणिपुरातील मूळ रहिवाशांना संरक्षण देण्यासाठी विधानसभेत तीन विधेयके पारित करण्यात आली होती. त्यानंतर काही तासातच हिंसाचाराचा उद्रेक झाला. मंगळवारी सायंकाळी संतप्त जमावाने चुडाचंदपूर पोलीस ठाण्यावर हल्ला केला. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तीन जण ठार तर चार लोक जखमी झाले. मृतांमध्ये एका १० वर्षीय मुलाचा समावेश आहे. पाच जणांचा मृत्यू बंदकाळातील हिंसाचारात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाह्य मणिपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार थांगसो बेत, राज्याचे कुटुंबकल्याण मंत्री फुंगजांगफांग तोनसीम आणि थानलोमचे वुनगजागीन यांच्यासह पाच आमदारांची घरे जाळण्यात आली. घराची जाळपोळ करताना गंभीर जखमी झालेल्या एका हल्लेखोरास रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)