शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

मेहरुण तलावातून ७९ डंपर गाळ काढला

By admin | Updated: May 16, 2016 00:41 IST

जळगाव : मेहरूण तलावातील गाळ उपसण्याच्या कामाला आता गती आली असून रविवारी ७९ डंपर गाळ तलावातून काढण्यात आला. यामध्ये ४० खाजगी तर ३९ शासकीय डंपरचा समावेश आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत ही मोहीम सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.

जळगाव : मेहरूण तलावातील गाळ उपसण्याच्या कामाला आता गती आली असून रविवारी ७९ डंपर गाळ तलावातून काढण्यात आला. यामध्ये ४० खाजगी तर ३९ शासकीय डंपरचा समावेश आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत ही मोहीम सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.
दोन वर्षांपासून तलावातील गाळ काढला गेला नव्हता. यावर्षी तलावातील पाणी गळतीमुळे मोठ्या प्रमाणात कमी झाले. तलावाच्या कोरड्याभागातून गाळ काढला जावा अशी मागणी होत होती. त्यानुसार महापालिका, जलसंपदा विभाग व जैन उद्योग समूहाने पुढाकार घेऊन गेल्या तीन दिवसांपासून मेहरूण तलावातून गाळ उपसण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.

७९ डंपर गाळ काढला
मेहरूण तलावात गाळ काढण्यासाठी जलसंपदा विभागाचे ३ डंपर, एक मोठा पोकलॅँड, दोन जेसीबी अशी साधने उपलब्ध आहेत. तर जैन उद्योग समूहाचे एक जेसीबी व चार डंपर गाळ उपसण्याचे काम करीत आहेत. रविवारी दिवसभरात तलावातील ७९ डंपर गाळ काढण्यात आला. शनिवारपर्यंत २२५ ब्रास गाळ काढण्यात आला होता.

शेतकर्‍याने नेला चार डंपर गाळ...
रविवारी एका शेतकर्‍याने येथील चार डंपर गाळ नेल्याचे सांगण्यात आले. गाळ नेल्यास प्रतिसाद नसल्याचे चित्र आहे.

पावसाळ्यापर्यंत काढणार गाळ...
दोन वर्षांपासून तलावातील गाळ काढला न गेल्याने तलावामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे आता सुरू केलेली ही मोहीम पावसाळ्यापर्यंत चालण्याचा अंदाज आहे. कदाचित पावसाळा सुरू झाला तरी गाळ काढणे पूर्ण होणे शक्य नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे जो पर्यंत तलावात पाणी येत नाही तो पर्यंत गाळ काढणे सुरूच राहणार आहे.

अडीच फूट गाळ...
तलावातून जो पर्यंत मुरुम लागत नाही तो पर्यंत गाळ काढण्यात येणार आहे. यामध्ये तलावाच्या मध्यभागी साधारण दोन ते अडीच फुटापर्यंत तर आजूबाजूला त्या पेक्षा कमी गाळ असण्याची शक्यता आहे. तो पूर्ण गाळ काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

गाळ तलावाच्या बाजूला...
तलावातून काढलेला हा गाळ तलावाच्या आजुबाजूला टाकला जात आहे तर खाजगी डंपर इतरत्र नेत असल्याचे सांगण्यात आले. तलावाच्या बाजूला एवढा गाळ टाकायचा म्हटल्यास जागा अपूर्ण पडणार आहे, असेही सांगण्यात आले.