भ्रष्टाचाराच्या तक्रारींमध्ये गेल्यावर्षी ७९ टक्के वाढ वेळीच निपटारा : केंद्रीय दक्षता आयोगाची माहिती
By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST
नवी दिल्ली : केंद्रीय दक्षता आयोगाकडे(सीव्हीसी) २०१४ मध्ये भ्रष्टाचारासंबंधी ६३ हजारांपेक्षा जास्त तक्रारी आल्या असून, त्याआधीच्या वर्षाच्या म्हणजे २०१३ च्या तुलनेत ही संख्या ७९ टक्के जास्त आहे. गेल्यावर्षी आयोगाकडे ६३,२८८ तक्रारी आल्या होत्या. २०१३ मध्ये ही संख्या ३५,३३२ एवढी होती.
भ्रष्टाचाराच्या तक्रारींमध्ये गेल्यावर्षी ७९ टक्के वाढ वेळीच निपटारा : केंद्रीय दक्षता आयोगाची माहिती
नवी दिल्ली : केंद्रीय दक्षता आयोगाकडे(सीव्हीसी) २०१४ मध्ये भ्रष्टाचारासंबंधी ६३ हजारांपेक्षा जास्त तक्रारी आल्या असून, त्याआधीच्या वर्षाच्या म्हणजे २०१३ च्या तुलनेत ही संख्या ७९ टक्के जास्त आहे. गेल्यावर्षी आयोगाकडे ६३,२८८ तक्रारी आल्या होत्या. २०१३ मध्ये ही संख्या ३५,३३२ एवढी होती. गेल्यावर्षी आयोगाकडे भ्रष्टाचारासंबंधी आलेल्या तक्रारींचा उच्चांक नोंदला गेला होता. या सर्व तक्रारींचा निर्धारित मुदतीत निपटारा करण्यात आला. या तक्रारी केंद्र सरकारच्या विविध मंत्रालय आणि विभागांच्या भ्रष्टाचाराशी संबंधित होत्या. गेल्यावर्षी सीव्हीसीने दरमहा तयार केलेल्या अहवालाच्या आधारावर ही संख्या निश्चित करण्यात आली. सीव्हीसीच्या वार्षिक अहवालात अंतिम आकडेवारी दिली जात असून, दरवर्षी जूनमध्ये ती संसदेत सादर केल्यानंतर सार्वजनिक केली जाते.----------ठोस पुराव्यांचा अभावबहुतांश तक्रारी ठोस पुराव्यांच्या अभावी निकाली काढण्यात आल्या. भ्रष्टाचार संपविण्याच्या धोरणानुसार या तक्रारींची नोंद करण्यात आली. उर्वरित तक्रारी आवश्यक कार्यवाहीसाठी तसेच त्यासंबंधी अहवालासाठी संबंधित मंत्रालयाच्या मुख्य दक्षता अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आल्या, असे सीव्हीसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.--------वर्ष आणि तक्रारींची संख्या... २०१२- ३७,०३९२०११-१६,९२९२०१०- १६,२६०२००९-१४,२०६२००८- १०,१४२२००७-११,०६२२००६- १०,७९८२००५-९,३२०२००४-१०,७३५२००३-११,३९७