शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Morcha Update Live: "आंदोलनाची परवानगी वाढवून द्या, मी इथून उठणार नाही"; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
Ukrain Navy ship Video: युक्रेनवर रशियाचा 'प्रहार', मोठी युद्ध नौका उडवली, हल्ल्याचा व्हिडीओ समोर
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात अपशब्द बोलणाऱ्या विरोधात मोठी कारवाई; पोलिसांनी उचललं!
4
"आरक्षणाचा गुलाल डोक्यावर पडल्याशिवाय आता इथून हलायचं नाही..."; मनोज जरांगे यांचा निर्धार
5
दोन दिवसांच्या घसरणीनंतर बाजारात पुन्हा तेजी! 'या' सेक्टरने दिला सर्वाधिक आधार
6
Ratnagiri: गणेशोत्सवाला गालबोट! विसर्जनादरम्यान दोन जण जगबुडी नदीत बुडाले; एकाचा मृत्यू
7
Manoj Jarange: "मी शेवटपर्यंत मॅनेज होणार नाही", मनोज जरांगेचा सरकारला इशारा!
8
विराटचं 'ते' वाक्य अन् मोहित सुरींना सुचला 'सैयारा'मधला 'तो' सीन, किंग कोहलीकडून मिळाली प्रेरणा
9
Mumbai Traffic: जरांगे मुंबईत! आझाद मैदान गच्च भरलं; सीएसएमटी, फोर्ट परिसरात मोठी वाहतूक कोंडी
10
Danish Malewar Double Century : विदर्भकराची कमाल; पदार्पणाच्या सामन्यात द्विशतकासह रचला इतिहास
11
पंतप्रधान मोदी ७५ वर्षांचे झाल्यावर निवृत्ती घेणार? सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले- "RSS..."
12
भारतावर ५०% टॅरिफ पण, अमेरिका शेजारील देशांवर मेहेरबान! चीन ते पाकिस्तान कुणावर किती शुल्क?
13
पंतप्रधान मोदींच्या कामावर देश खुश की नाराज? नव्या सर्वेक्षणात जनतेचा मोठा खुलासा!
14
विशेष लेख: उद्धव-राज आणि फडणवीस : काहीतरी 'मेख' आहे!
15
Manoj Jarange Patil: मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
16
उत्तराखंडच्या चमोलीमध्ये ढगफुटीची; ढिगाऱ्यामुळे काही क्षणात अनेक लोक बेपत्ता; बचावकार्य सुरू
17
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
18
Ganesh Visarjan: दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप! मुंबईत दुसऱ्या दिवशी ५९,४०७ गणपती मूर्तींचे विसर्जन
19
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय

७७८ आक्षेपार्ह आॅनलाईन पोस्ट ब्लॉक

By admin | Updated: April 12, 2015 01:24 IST

नव्या वर्षाची पहिली तिमाही नुकतीच संपली; मात्र पोलिसांनी एव्हाना ७७८ आक्षेपार्ह ‘आॅनलाईन पोस्ट’ ब्लॉक केल्या आहेत.

डिप्पी वांकानी - मुंबईनव्या वर्षाची पहिली तिमाही नुकतीच संपली; मात्र पोलिसांनी एव्हाना ७७८ आक्षेपार्ह ‘आॅनलाईन पोस्ट’ ब्लॉक केल्या आहेत. हे प्रमाण गेल्या वर्षी ब्लॉक करण्यात आलेल्या अशा पोस्टच्या ८० टक्के एवढे आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या धर्मांध पोस्टस्ना आळा घालण्यासाठी सायबर सुरक्षा विभागाचे अधिकारी अहोरात्र काम करीत आहेत. सीमेपलीकडील समाजकंटक फेसबुक, टिष्ट्वटर यासारख्या सोशल नेटवर्किंग साईटवर धार्मिक भावना दुखावणारा मजकूर टाकून जातीय तणाव भडकावण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे सूत्रांनी सांगितले. २०१४ मध्ये पोलिसांच्या सोशल मीडिया लॅबने फेसबुक, टिष्ट्वटर व यूू ट्यूबवरील ११९२ आक्षेपार्ह व चिथावणीखोर पोस्ट ब्लॉक केल्या होत्या. यावर्षी मात्र ३१ मार्चपर्यंतच पोलिसांनी अशा ७७८ पोस्ट ब्लॉक केल्या आहेत. या पोस्ट भावना दुखावण्यास किंवा राज्यात दंगल उसळविण्यास कारणीभूत ठरण्याची शक्यता होती. यापैकी बहुतांश पोस्ट धर्मविरोधी होत्या. यात एकतर छायाचित्रांची मोडतोड (विद्रूपीकरण) करण्यात आली होती किंवा आक्षेपार्ह भाषेचा वापर करण्यात आला होता. अशा पोस्ट आॅनलाईन दिसताच त्या आणखी पसरण्यापूर्वीच आमचे पथक त्यांना ब्लॉक करते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. काही घटक देशात धार्मिक तणाव वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असेही हा अधिकारी म्हणाला.‘आम्ही विविध मापदंडांवर या पोस्टस्चे वर्गीकरण करतो. काही पोस्टमध्ये एखादी संघटना, राजकीय पक्ष किंवा नेत्यास उद्देशून लिहिलेला अपमानजनक मजकूर असतो, तर काही पोस्टमध्ये छायाचित्रांची मोडतोड (विद्रूपीकरण) करून नेत्यांना नको त्या स्थितीत दाखविण्यात आलेले असते. काही पोस्ट धार्मिक भावना दुखावू शकणाऱ्या असतात, तर काही अश्लील स्वरूपाच्या असतात’, असे गुप्तवार्ता विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.1 आक्षेपार्ह आॅनलाईन पोस्टमुळे राज्यात यापूर्वी दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. तशी स्थिती पुन्हा उद्भवू नये हा अशा पोस्ट ब्लॉक करण्यामागचा मुख्य हेतू आहे. आॅनलाईन वात्रटपणामुळे आम्हाला यापूर्वी दंगलीला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे आम्ही आता अधिक काळजी घेत असून आॅनलाईन आक्षेपार्ह मजकुराची ओळख पटविण्यासाठी आम्ही आता शक्तिशाली चाळण्या लावल्या आहेत, असेही हा अधिकारी म्हणाला. 2 आक्षेपार्ह पोस्ट ब्लॉक करण्यात आल्या असल्या तरी त्यामागील खरे सूत्रधार हाती लागणे कठीण आहे. कारण, फेसबुक, टिष्ट्वटर आदी साईटवर फेक खाती वापरून असे प्रकार केले जातात.