मोहोळमध्ये 77़68 टक्के मतदान नगरपरिषद निवडणूक : 104 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद
By admin | Updated: April 18, 2016 00:47 IST
मोहोळ :
मोहोळमध्ये 77़68 टक्के मतदान नगरपरिषद निवडणूक : 104 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद
मोहोळ : 96 वर्षांनंतर लागलेल्या पहिल्याच नगरपरिषद निवडणुकीसाठी 17 रोजी चुरशीने 77़68 टक्के मतदान झाल़े एकूण 17 हजार 387 मतदारांपैकी 13 हजार 506 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला़ आज 104 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाल़े मोहोळ नगरपरिषदेच्या 17 जागांसाठी रविवारी सकाळी 7़30 वाजता मतदानप्रक्रियेस प्रारंभ झाला़ उन्हाची तीव्रता वाढत असल्याने मतदारांनी सकाळीच मतदान करणे पसंत केल़े जवळपास एकूण 17 वार्डांसाठी 19 बुथची व्यवस्था करण्यात आली होती़ या बुथवर सकाळपासूनच मतदारांनी रांगा लावून मतदान केल़े यामध्ये महिला मतदारांची संख्या जास्त होती़ दुपारी 1 नंतर 4 वाजेपर्यंत बुथवर शांतता होती़ दुपारी 4 नंतर पुन्हा मतदानाला वेग आला़मतदानप्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी नगरपरिषद निवडणूक निरीक्षक संजय चव्हाण, निवडणूक निर्णय अधिकारी मारुतीराव बोरकर, तहसीलदार बी़ आऱ माळी, सहा़ निवडणूक निर्णय अधिकारी आशिष लोकरे यांच्यासह नगरपरिषदेच्या कर्मचार्यांनी दिवसभर बुथवर पेट्रोलिंगद्वारे लक्ष ठेवले होत़े शहरात दिवसभर विविध पक्षांचे प्रमुख तळ ठोकून होत़े त्यात काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष संतोष पाटील, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख धवलसिंह मोहिते-पाटील, दीपक गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, काकासाहेब देशमुख, मोहोळ शहर विकास आघाडीचे प्रमुख रमेश बारसकर, राष्ट्रवादीचे नेते शहाजहान शेख, ब्र?ादेव भोसले, भाजपाचे नेते नागनाथ क्षीरसागर, सोमेश क्षीरसागर, संजय क्षीरसागर, काँग्रेसचे साईनाथ गायकवाड, किशोर पवार, आ़ रमेश कदम आघाडीचे संतोष कदम, उमेश कदम आदींसह सर्वच पक्षांचे नेते व कार्यकर्ते बसले होत़ेअत्यंत चुरशीच्या झालेल्या मतदानामध्ये प्रामुख्याने वॉर्ड क्ऱ 2, वॉर्ड क्ऱ 16, वॉर्ड क्ऱ 4, वॉर्ड क्ऱ 15, वॉर्ड क्ऱ 3 मध्ये अटीतटीच्या लढती झाल्या आहेत़ त्यामुळे 17 जागांसाठी 104 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाल़े मतमोजणी सोमवार, दि़ 18 रोजी सकाळी 10 वाजता तहसील कार्यालयात होणार असल्याचे मारुतीराव बोरकर यांनी सांगितल़ेअसे झाले मतदानसकाळी 7़30 ते 9़30 पर्यंत 16़81 टक्के, दुपारी 1़30 पर्यंत 54़77 टक्के, दुपारी 3़30 वाजेपर्यंत 66 टक्के आणि 4 ते 5़30 पर्यंत 77़68 टक्के मतदान झाल़े एकूण 17 हजार 387 पैकी 13 हजार 506 मतदारांनी मतदान केल़े त्यात पुरुष 7 हजार 133 तर महिला 8 हजार 220 मतदारांचा समावेश होता़ मतदानामध्ये महिलांची संख्या जास्त होती़बुथनिहाय आकडेवारीप्रभागमतदान (टक्केवारीत)प्रभाक क्ऱ 180़24 टक्केप्रभाक क्ऱ 2 80़73 टक्केप्रभाक क्ऱ 376़58 टक्केप्रभाक क्ऱ 477़79 टक्केप्रभाक क्ऱ 584़40 टक्केप्रभाक क्ऱ 6 76़78 टक्केप्रभाक क्ऱ 777़94 टक्केप्रभाक क्ऱ 872़59 टक्केप्रभाक क्ऱ 969़71 टक्केप्रभाक क्ऱ 1075़84 टक्केप्रभाक क्ऱ 1179़38 टक्केप्रभाक क्ऱ 12 77़15 टक्केप्रभाक क्ऱ 1371़03 टक्केप्रभाक क्ऱ 14 84़60 टक्केप्रभाक क्ऱ 1578़16 टक्केप्रभाक क्ऱ 1685़87 टक्केप्रभाक क्ऱ 1783़70 टक्के