सुरेश भटेवरा नवी दिल्ली : देशातील उच्च विद्याविभूषितांसाठी केंद्र सरकारने पंतप्रधान स्कॉलरशिप योजना जाहीर केली असून, त्याद्वारे प्रतिभावान विद्यार्थ्यांनी परदेशात जाऊ नये, म्हणून प्रयत्न केले जाणार आहेत. मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती देताना सांगितले की, दरवर्षी टॅलेंट छाननीद्वारे निवडलेल्या एक हजार विद्यार्थ्यांना दरमहा ७५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाईल.प्रतिभावान विद्यार्थी तीन कारणांसाठी उच्च शिक्षणासाठी परदेशात जातात, असे सांगून जावडेकर म्हणाले की, परदेशात संशोधनासाठी आधुनिक तंत्रसामुग्रीने सज्ज उत्तम प्रयोगशाळा असतात. तिथे उच्च शिक्षणासाठी आकर्षक शिष्यवृत्त्या व आंतरराष्ट्रीय दर्जाचे चांगले मार्गदर्शक मिळतात. या तिन्ही सुविधा देशातच उपलब्ध करून देण्याचे सरकारने ठरविले आहे, शिवाय ही शिष्यवृत्तीही दिली जाईल.भारतात आंतरराष्ट्रीय दर्जाची २0 विद्यापीठे असावीत आणि जगातील पहिल्या २00 विद्यापीठांमध्ये त्यांची गणना व्हावी, यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने विविध स्तरांवर प्रयत्न चालविले आहेत. शिक्षणाचा दर्जा सुधारण्याच्या हेतूने, विविध योजनांसाठी २0 हजार कोटी रुपयांच्या खर्चास सरकारने मंजुरी दिली आहे, असेही जावडेकर म्हणाले.>लोगो बनविणाºयांसाठी पुरस्कारउच्च शिक्षण स्तरावर टॅलेंट व नावीन्याला वाव मिळावा, यासाठी विविध प्रकारच्या स्पर्धाही आयोजित करण्यात येतील. इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी नव्या संशोधनासाठी एक स्पर्धा असेल आणि त्यासाठी तीन कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे पुरस्कार असतील. मोदी सरकारच्या ‘न्यू इंडिया’ उपक्रमाचा लोगो बनविणाºया विजेत्याला ५0 हजारांचा पुरस्कार दिला जाईल.
प्रतिभावान विद्यार्थ्यांना ७५ हजार स्कॉलरशिप, पंतप्रधान स्कॉलरशिप योजना जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 01:33 IST