शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

कोराडी मंदिरात ७५०० अखंड मनोकामना ज्योती

By admin | Updated: August 31, 2015 00:24 IST

(फोटो)

(फोटो)
कोराडी मंदिरात ७५०० अखंड मनोकामना ज्योती
श्री जगदंबा संस्थानची आढावा सभा : नवरात्र उत्सवाच्या तयारीवर चर्चा
कोराडी : स्थानिक श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाची आढावा बैठक शनिवारी मंदिराच्या सभागृहात पार पडली. त्यात आगामी नवरात्र उत्सवाच्या तयारीसंदर्भात विस्तृत चर्चा करण्यात आली असून, यावर्षी मंदिराच्या ज्योतीभवनात ७५०० अखंड मनोकामना ज्योती प्रज्वलित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पालकमंत्री तथा संस्थानचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत आगामी अश्विन नवरात्र उत्सवाच्या पूर्वतयारीवर चर्चा करण्यात आली. मंदिराच्या परिसरात प्रलंबित असलेल्या काही विकास कामांना मंजुरी देण्यात आली. यावेळी मंदिरातील विजेची व्यवस्था, विद्युत रोशनाई, घटाचे नारळ, फूल, हार, तेलाचे पिंप, केबल नेटवर्क, सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा रक्षकांची नियुक्ती आदींबाबतच्या निविदा तसेच हलव्याचा प्रसाद वितरित करणे, ज्योतीभवनात ७५०० अखंड मनोकामना ज्योती प्रज्वलित करणे, या अखंड ज्योतीचे बुकिंग मंदिरातच करणे, बुकिं गपोटी भाविकांकडून ५५१ रुपये संस्थानच्या कार्यालयात जमा करणे, त्यासाठी काऊंटर सुरू करणे आदी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मागील नवरात्र उत्सवादरम्यान ६२५१ अखंड मनोकामना ज्योती प्रज्वलित करण्यात आल्या होत्या.
यावर्षी नवरात्र उत्सव मंगळवारपासून (दि. १३ सप्टेंबर) सुरू होत आहे. त्यामुळे मंदिरात पहिल्याच दिवशी दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होणार असल्याने भाविकांच्या विविध सुविधांवरही चर्चा करण्यात आली. या सभेला संस्थानचे उपाध्यक्ष दयाराम तळसकर, सचिव केशव फुलझेले, बाबूूराव भोयर, डी. जी. चन्ने, नारायण जामदार, प्रेमलाल पटेल, अशोक खानोरकर, नंदू बजाज, ॲड. मुकेश शर्मा, स्वामी निर्मलानंद, दत्तू समरीत, नंदिनी त्रिपाठी आदी विश्वस्त उपस्थित होते. (प्रतिनिधी)
***