शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
4
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
5
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
6
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
7
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
8
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
9
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
10
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
11
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
12
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
13
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
14
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
15
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
16
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
17
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
18
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
19
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
20
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय

राष्ट्रपती निवडणारे ७५% कोट्यधीश

By admin | Updated: July 16, 2017 23:41 IST

पुढील आठवड्यातील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी होणार असलेल्या एकूण मतदानापैकी ७५ टक्के मतदान कोट्यधीश

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पुढील आठवड्यातील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी होणार असलेल्या एकूण मतदानापैकी ७५ टक्के मतदान कोट्यधीश असलेले आमदार आणि खासदार करणार आहेत. ३,४६0 आमदार-खासदारांनी आपली संपत्ती १ कोटीपेक्षा जास्त असल्याचे घोषित केलेले आहे.असोसिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने दिलेल्या महितीनुसार, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील एकूण १0,९१,४७२ मतांपैकी ८,१८,७0३ मते कोट्यधीश आमदार-खासदार टाकणार आहेत. एकूण मतांच्या तुलनेत कोट्यधीशांच्या मतांचे प्रमाण ७५ टक्के इतके भरते.एडीआर आणि नॅशनल इलेक्शन वॉच (एनईडब्ल्यू) यांनी निवडणूक आयोगाकडील शपथपत्रांतील मालमत्ताविषयक आकडेवारीचे विश्लेषण करून हा निष्कर्ष काढला आहे. या संस्थांनी ४,८९६ पैकी ४,८५२ शपथपत्रांचे विश्लेषण केले आहे. निवडणुकीच्या वेळी उमेदवार म्हणून अर्ज भरताना ही शपथपत्रे दाखल करण्यात आली आहेत.विश्लेषण करण्यात आलेल्या शपथपत्रांपैकी ७७४ शपथपत्रे खासदारांची तर ४,0७८ शपथपत्रे आमदारांची आहेत.१७ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होत आहे. देशातील खासदार आणि आमदार हे या निवडणुकीत मतदार असतात. ही निवडणूक थेट मत पद्धतीने होत नाही. निर्वाचन मंडळ (इलेक्ट्रोरल कॉलेज) पद्धतीने होते. सर्व आमदार खासदारांच्या मतांचे मूल्य १0,९१,४७२ मते इतके आहे. एका खासदाराच्या मताचे मूल्य ७0८ मते इतके गृहीत धरले जाते. आमदारांच्या मतांचे मूल्य राज्यनिहाय बदलते. राज्य विधानसभेची सदस्य संख्या आणि राज्याची लोकसंख्या यानुसार आमदारांच्या मतांची किंमत ठरते.विश्लेषण करण्यात आलेल्यांपैकी ३,३६0 आमदार-खासदार कोट्यधीश आहेत. एकूण आमदार-खासदारांच्या तुलनेत कोट्यधीश आमदार-खासदारांचे प्रमाण सुमारे ७१ टक्के इतके आहे. त्यात लोकसभेचे ४४५ सदस्य, राज्यसभेचे १९४ सदस्य आणि राज्य विधानसभांचे २,७२१ सदस्य यांचा समावेश आहे.