शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेला ७५ कोटींचा निधी

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेच्या वतीने करण्यात येणार्‍या विकासकामांवर येणार्‍या खर्चाच्या ७५ टक्के भार राज्य सरकारने उचलण्याचा निर्णय घेतल्याने महापालिकेच्या आराखड्यानुसार ७५ कोटी रुपयांचा निधी कुंभमेळा कक्षाकडून वर्ग करण्यात आला आहे. महापालिकेला अजून सव्वातीनशे कोटी रुपये अपेक्षित आहेत.

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेच्या वतीने करण्यात येणार्‍या विकासकामांवर येणार्‍या खर्चाच्या ७५ टक्के भार राज्य सरकारने उचलण्याचा निर्णय घेतल्याने महापालिकेच्या आराखड्यानुसार ७५ कोटी रुपयांचा निधी कुंभमेळा कक्षाकडून वर्ग करण्यात आला आहे. महापालिकेला अजून सव्वातीनशे कोटी रुपये अपेक्षित आहेत.
नाशिक महापालिकेने सुमारे अकराशे कोटी रुपये खर्चाचा आराखडा तयार केला असून, त्यासाठी निधीची उपलब्धता हा मोठा प्रश्न आहे. राज्य सरकारने हा सारा खर्च उचलावा, अशी महापालिकेची मागणी होती, परंतु शासनाने ७५ टक्के वाटा उचलण्याचे मान्य करून त्यापोटी आजवर सव्वातीनशे कोटी रुपये उपलब्ध करून दिले, मात्र सुरू असलेल्या कामांच्या तुलनेत मिळालेला निधी अपुरा असल्याने महापालिकेने पुन्हा मागणी केल्याने गेल्या आठवड्यात कुंभमेळा कक्षाने ७५ कोटी रुपये नव्याने उपलब्ध करून दिले आहेत. सिंहस्थ कुंभमेळा कक्षाकडे सव्वाशे कोटी रुपये शिल्लक होते, त्यापैकी महापालिकेला ७५ कोटी दिल्याने आता उरलेल्या निधीतून पुरातत्व खात्यानेही पाच कोटी रुपयांची मागणी केली आहे. कुंभमेळ्यातील कामांबाबत यंत्रणांकडून केल्या जात असलेल्या कामाच्या टप्प्यात निधीचे वितरण केले जात आहे. त्यामुळे अजूनही कुंभमेळा कक्षाकडे उपलब्ध असलेला निधी पुरेसा असून, मार्चमध्ये शासनाकडून उर्वरित निधी येण्याची अपेक्षा आहे.
महापालिकेप्रमाणेच साधुग्रामसाठी अधिग्रहीत करण्यात आलेल्या जागेच्या भाड्यापोटीची रक्कमही उपलब्ध करून देण्यात आली असून, ती थेट शेतकर्‍यांच्या बॅँक खात्यात जमा केली जाणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी त्यांच्या बॅँक खात्याची माहिती प्रशासनाला सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.