शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

७५ देशांना भूमिका समजाविण्यात मिळाले यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 05:33 IST

मुत्सद्देगिरीचा परिणाम; पाकिस्तानला मिळाले नाही कोणत्याही देशाचे समर्थन

- शीलेश शर्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय समुदायात वेगळे पाडण्यात भारताला मुत्सद्देगिरीमुळे मोठे यश मिळाले आहे. जगातील जवळपास ७५ देशांना पाकिस्तान हा दहशतवाद्यांचा आश्रयदाता बनल्याचे समजावून सांगण्यात भारत यशस्वी ठरला. त्यामुळे जगातील सर्व देशांनी भारताने केलेल्या हवाई कारवार्ईचे समर्थन केले आहे, तर पाकिस्तानने बुधवारी भारतीय हद्दीत घुसून केलेल्या हल्ल्याला कोणाही देशाने समर्थन दिले नाही. काही देशांनी मात्र दोन्ही देशांनी संयम पाळावा, असे आवाहन केले आहे.

आॅस्ट्रेलियाने आपल्या निवेदनात भारतीय कारवाईचे समर्थन करून जैश-ए-मोहम्मद आणि पाकिस्तानच्या नावाचा उल्लेख करून अतिरेकी कारवायांना पाकने आवरावे, असा सल्ला दिला.नियंत्रण रेषेपलीकडे भारताने केलेल्या कारवाईनंतर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री व इतर देशांच्या प्रतिनिधींशी थेट बोलून त्यांना भारताने कोणतीही लष्करी कारवाई केलेली नाही, तर फक्त दहशतवादाला नष्ट करण्यासाठी मोजक्या ठिकाणांना उद्ध्वस्त करण्याचे काम केले हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.

चीनने दोन्ही देशांनी संयम बाळगण्यास सांगितले, तरी चीनचा कल पाहता त्याचे वर्तन व भाषा यांच्यात अंतर असते. आतापर्यंत चीनचा व्यापक पाठिंबा पाकिस्तानला मिळालेला आहे व त्याच बळावर तो भारताविरुद्ध आवाज चढवून बोलत असतो. चीन पाकिस्तानला शस्त्रास्त्रांपासून इतर सगळ्या प्रकारची मदत देत आला आहे. एवढेच काय, मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांत चीनने संयुक्त राष्ट्रांत नकाराधिकाराचा वापर करून अडथळे आणले, पण चीनला भारताशी संबंध बिघडू द्यायचे नाहीत. संबंध चांगले राखण्यामागे मोठी भारतीय बाजारपेठेचे कारण आहे. या बाजारात तो आपली उत्पादने विकत असतो. चीन केवळ आपल्या आर्थिक आणि लष्करी स्वार्थासाठी आणि भारताला दुबळे करण्यासाठी पाकिस्तानसोबत आहे.युरोपीय देशांचाही भारताला पाठिंबायुरोपीय देशांत फ्रान्स, ब्रिटनसह इतर देशांनीही भारताला पाठिंबा दिला, परंतु तो गुळमुळीत होता. त्यात थेटपणे पाकिस्तानचा थेट उल्लेख नसला, तरी बोट त्या दिशेनेच होते. अमेरिकेनेही दोन्ही देशांनी संयम राखून चर्चेद्वारे प्रश्न सोडवावेत, असे म्हटले. या परिस्थितीत भारत सतत जगाला ही जाणीव देत आला आहे की, पाकिस्तान अतिरेक्यांना आश्रयच देतोय, असे नाही तर त्याचे पोषण करून जगाला धोका निर्माण करीत आहे. जो धोका आज भारतासमोर आहे, तो उद्या दुसऱ्या देशांसमोर असेल.