शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ७५ जाती आरक्षणाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST

राज्यातील ७५ जाती आरक्षणाच्या प्रतीक्षेत

राज्यातील ७५ जाती आरक्षणाच्या प्रतीक्षेत
सरकार उदासी : अयोगावरील नियुक्ती रखडली
यदु जोशी
मुंबई - गुजरातमध्ये आरक्षणाच्या मागणीवरून पटेल समाजाचे आंदोलन पेटले असताना महाराष्ट्रात तब्बल ७५ जाती आरक्षण मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत, तर अनेक जातींना आपला प्रवर्ग बदलून हवा आहे. त्याचवेळी मागासवर्ग आयोगावरील सदस्यांची नियुक्ती रखडली आहे.
न्या.भाटिया अध्यक्ष असलेल्या या आयोगावर सहा महसुली विभागातून प्रत्येकी एक आणि एक समाजशास्रज्ञ अशा सात सदस्यांची नियुक्ती राज्य सरकारने अद्याप केलेली नाही. आधीच्या सदस्यांची मुदत ३१ डिसेंबर २०१४ रोजीच संपली.
आयोगाकडे एखाद्या जातीचा आरक्षणासाठी अर्ज आल्यानंतर आयोगाचे सदस्य त्या जातीसमूहात जाऊन सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपणाची चौकशी करतात आणि अहवाल देतात. त्या अहवालाच्या आधारे आयोगाचे सदस्य विशिष्ट प्रवर्गात विशिष्ट जातीला समाविष्ट करायचे की नाही यासाठी याची शिफारस सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांकडे करतात. सचिव मग तो अहवाल मंत्र्यांकडे सोपवितात आणि मंत्र्यांकडून तो मंत्रिमंडळाच्या उपसमितीकडे जातो. उपसमितीची शिफारस राज्य मंत्रिमंडळाकडे जाऊन मग अंतिम निर्णय घेतला जातो.
राज्य मागासवर्गाकडे सध्या ज्या ७५ जातींचे अर्ज प्रलंबित आहेत त्यांचे अर्ज २००२ ते २०१४ या काळातील आहेत. याचा अर्थ काही जातींना तब्बल एक तपाहून अधिक काळापासून आयोग आणि सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे.
-----------------------------------
आयोगाचा अधिकार
एखाद्या जातीचा समावेश विशिष्ट प्रवर्गात समाविष्ट करावा, अशी शिफारस आयोगाने केली तर ती सामान्यपणे सरकारने स्वीकारावी, असा नियम आहे पण ती शासनाला स्वीकारायची नसेल तर त्यासाठी ठोस कारणे आणि आकडेवारी देणे सरकारवर बंधनकारक आहे. आयोगाने शिफारस केलेली नसेल तर सरकारला आपल्या अखत्यारित आरक्षण देता येत नाही.
------------------------------------------------------------
७४ ओबीसी जातींना प्रवर्ग बदलून हवाय
राज्यात इतर मागासवर्गीयांमध्ये (ओबीसी) एकूण ३५५ जातींचा समावेश आहे. त्यातील ७४ जातींना ओबीसी हा प्रवर्ग सोडायचा आहे. आम्हाला भटक्या-विमुक्त जमाती प्रवर्गात समाविष्ट करा, अशी त्यांची मागणी आहे.
भटक्या विमुक्तांच्या ५१ जाती असून त्यातील २७ जातींना अनुसूचित जातींमध्ये समाविष्ट करण्याची मागणी आहे.
----------------------------------
चितोडेवाणी, काथार/कंठहार वाणी, बहुरुपी, कंसारा, नायक मराठा, लोणी मराठा, हणबर, बलोची मुस्लिम, सोमवंशी क्षत्रिय, गवळी, हलबा, हिंदू वैश्य कोमटी, मुस्लिम, भोयर पवार, राठोड, कुडाळ देशस्थ, ब्रšावैश्य, राणा राजपूत, लिंगायत वैरशैव, लिंगायत रंगारी आदींसह ७५ जातींना वेगवेगळ्या प्रवर्गांमध्ये आरक्षण हवे आहे.
-----------------------------------