श्रीनगर/ रांची : जम्मू-काश्मिरातील १८ मतदारसंघांमध्ये मंगळवारी दुसऱ्या टप्प्यात ७१ टक्के मतदानाची नोंद झाली. पहिल्या टप्प्यातही या राज्यात विक्रमी मतदान झाले होते. फुटीरवाद्यांनी केलेले बहिष्काराचे आवाहन झुगारून मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. झारखंडमध्ये दुसऱ्या टप्प्यात ८१ मतदारसंघामध्ये ६५.४६ टक्के मतदान झाले. या दोन्ही राज्यांमध्ये शांततेत मतदान पार पडले.जम्मू-काश्मीरमध्ये अनेक मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. विघटनवादी राजकारण्यांना हा जबर फटका मानला जातो. अंतिम आकडेवारी हाती आल्यानंतर मतदानाची टक्केवारी आणखी वाढू शकते, असे उप निवडणूक आयुक्त विनोद झुत्सी यांनी दिल्लीत सांगितले. झारखंडच्या छत्तरपूर मतदारसंघातील दोन तर गढवा मतदारसंघातील एका मतदान केंद्रावरही फेरमतदान शांततेत झाल्याचे या राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी पी.के. जाजोरिया यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
जम्मू आणि काश्मिरात ७१, झारखंडमध्ये ६५ टक्के मतदान
By admin | Updated: December 3, 2014 01:35 IST