शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

७० टक्के अंध असलेले सुरेंद्र मोहन होणार न्यायाधीश

By admin | Updated: July 19, 2015 23:25 IST

७० टक्के अंध असलेले सीबीआयचे प्रॉसिक्युटर व्ही. सुरेंद्र मोहन यांचा न्यायाधीश होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. निवड प्रक्रियेत त्यांच्यासाठी एक जागा राखून ठेवा

चेन्नई : ७० टक्के अंध असलेले सीबीआयचे प्रॉसिक्युटर व्ही. सुरेंद्र मोहन यांचा न्यायाधीश होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. निवड प्रक्रियेत त्यांच्यासाठी एक जागा राखून ठेवा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकारला दिला आहे.गत १० जुलैला न्या. व्ही. गौडा आणि न्या. एस.ए. बोबडे यांच्या खंडपीठाने याबाबतचा अंतरिम आदेश दिला होता. चेन्नईच्या थिरुवोत्रियूरचे सुरेंद्र मोहन यांनी लेखी परीक्षा दिली होती. मात्र त्यांचे नाव मुलाखतीसाठी निवड झालेल्यांच्या यादीत नव्हते. आपले नाव या यादीत समाविष्ट व्हावे, यासाठी त्यांनी एक याचिका दाखल केली होती. न्यायालयाने त्यांना मुलाखतीत भाग घेण्याची परवानगी देत, त्यांचा निकाल सील ठेवला होता. एका आदेशानंतर त्यांचा निकाल उघड करण्यात आला. त्यानुसार, सुरेंद्र यांनी लेखी परीक्षेत ४०० पैकी १७८ गुण मिळवले होते तर मुलाखतीत ६० पैकी ३८.२५ टक्के गुण संपादन केले होते.यानंतर दिवाणी न्यायाधीशपदावरील नियुक्तीसाठी सुरेंद्र पात्र आहेत का, अशी विचारणा न्यायालयाने तामिळनाडू सरकारकडे केली होती. यावेळी ते या पदावरील नियुक्तीसाठी योग्य असल्याचे तामिळनाडू राज्य सेवा आयोगाकडून सांगण्यात आले होते. मुलाखतीदरम्यान ते अगदी सहज होते. मात्र ५० टक्क्यांपेक्षा अधिक अंधत्व असल्याने त्यांची निवड करण्यात आली नव्हती, असे आयोगाने सांगितले होते. (वृत्तसंस्था)नियमानुसार, ४० ते ५० टक्क्यांदरम्यान अंधत्व मान्य आहे. मात्र त्यापेक्षा अधिक अंधत्व असल्यास त्यास अपात्र ठरवले जाते. मात्र याउपरही सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि जबर इच्छाशक्ती या जोरावर सुरेंद्र मोहन दिवाणी न्यायाधीशपदापर्यंत पोहोचले.