शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

७० टक्के ओपनस्पेसला मनपाचे नाव लागणे बाकी अनास्था: नगररचनाकडून होणार कार्यवाही; संस्थांना दिलेल्या ओपनस्पेसही घेणार परत

By admin | Updated: October 6, 2016 19:43 IST

जळगाव: ले-आऊट मंजूर करताना त्यातील मोकळी जागा (ओपनस्पेस) ही मनपाच्या मालकीची समजली जाते. त्याला मनपाचे नाव लावणे आवश्यक असताना वाढीव हद्दीच्या आराखडा मंजुरीपूर्वी ले-आऊट मंजूर झालेल्या ७० टक्के ओपनस्पेसला मनपाचे नावच लागलेले नाही. तर आराखडा मंजुरीनंतरच्या मंजूर ले-आऊटमधील मिळून ३० टक्के ओपनस्पेसला मनपाचे नाव लागले आहे.

जळगाव: ले-आऊट मंजूर करताना त्यातील मोकळी जागा (ओपनस्पेस) ही मनपाच्या मालकीची समजली जाते. त्याला मनपाचे नाव लावणे आवश्यक असताना वाढीव हद्दीच्या आराखडा मंजुरीपूर्वी ले-आऊट मंजूर झालेल्या ७० टक्के ओपनस्पेसला मनपाचे नावच लागलेले नाही. तर आराखडा मंजुरीनंतरच्या मंजूर ले-आऊटमधील मिळून ३० टक्के ओपनस्पेसला मनपाचे नाव लागले आहे.
मनपाच्या मालकीच्या अनेक मालमत्तांना सातबारा उतार्‍यावर मनपाचे नावच लागलेले नाही. मासळी मार्केटसाठीच्या जागेच्या विषयावरून पुन्हा एकदा याविषयावर महासभेत जोरदार चर्चा झाली. त्यामुळे आयुक्तांनी ओपनस्पेसला मनपाचे नाव लावण्याची जबाबदारी नगररचना विभागावर तर इतर मालमत्तांना मनपाचे नाव लावण्याची जबाबदारी बांधकाम विभागावर सोपविली आहे.
७० टक्के ओपनस्पेस नावावर नाहीत
बांधकामासाठी ले-आऊट मंजूर करताना तेथील रहिवाशांना वापरासाठी तसेच हवा खेळती रहावी यासाठी ओपनस्पेस सोडणे बंधनकारक आहे. त्यावर अतिक्रमण होऊ नये म्हणून देखभालीसाठी त्या ओपनस्पेसची मालकी मनपाकडे असते. त्यामुळे मनपाचे नाव सातबारा उतार्‍यावर मनपाचे नाव लावले जाते. मात्र वाढीव हद्दीचा आराखडा मंजूर झाला. त्यापूर्वी मनपाच्या हद्दीबाहेर जे ले-आऊट मंजूर झाले हेाते. त्यातील ओपनस्पेसला मनपाचे नाव लावणे बाकी आहे. तर वाढीव हद्दीचा आराखडा २००१ मध्ये मंजूर झाला. त्यानंतर सुमारे मंजूर झालेल्या ३० टक्के ले-आऊटमधील ओपनस्पेसला मात्र मनपाचे नाव लावले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तब्बल ७० टक्के ओपनस्पेसला नाव लावण्याचे काम नगररचना विभागाला पार पाडावे लागणार आहे.
सर्व ओपनस्पेस घेणार ताब्यात
महासभेत झालेल्या चर्चेनंतर नगररचना विभागाने सर्व ३९३ ओपनस्पेसची सद्यस्थिती काय आहे? जागेवर १० टक्केच बांधकाम आहे की जास्त? ज्या संस्थेला जागा दिली होती, त्यांच्याच ताब्यात ती जागा आहे की अन्य संस्थेच्या ताब्यात, करारातील अटी-शर्तीर्ंचा भंग झाला आहे का? आदी मुद्यांवर पुन्हा सर्व्हे सुरू केला आहे. त्यानंतर सर्व ओपनस्पेस परत मनपाच्या ताब्यात घेण्याची कारवाई केली जाणार आहे.