वृद्ध व निराधारांना ७० लाखांचे वाटप दिवाळी गोड होणार : पाचोरा व जळगाव ग्रामीणमधील लाभार्थींना दिलासा
By admin | Updated: October 30, 2015 23:56 IST
जळगाव : शासनातर्फे ज्येष्ठ नागरिक, विधवा व निराधार नागरिकांसाठी देण्यात येणार्या अनुदानाचे वाटप करण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांनी दिले आहे. त्या अनुशंगाने ६९ लाख ७९ हजार ८०० रुपयांचा निधी लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. दिवाळीच्या काळात निराधारांना ही रक्कम मिळणार असल्याने त्यांची दिवाळी गोड आणि सुखद होणार आहे.
वृद्ध व निराधारांना ७० लाखांचे वाटप दिवाळी गोड होणार : पाचोरा व जळगाव ग्रामीणमधील लाभार्थींना दिलासा
जळगाव : शासनातर्फे ज्येष्ठ नागरिक, विधवा व निराधार नागरिकांसाठी देण्यात येणार्या अनुदानाचे वाटप करण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांनी दिले आहे. त्या अनुशंगाने ६९ लाख ७९ हजार ८०० रुपयांचा निधी लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. दिवाळीच्या काळात निराधारांना ही रक्कम मिळणार असल्याने त्यांची दिवाळी गोड आणि सुखद होणार आहे.पाचोरा व जळगाव ग्रामीण मतदार संघातील ज्येष्ठ नागरिक, विधवा आणि निराधार लाभार्थ्यांचे डिसेंबर २०१४ पासूनचा पगार तांत्रिक कारणांमुळे अडकून होता. लाभार्थ्यांच्या पगाराबाबत वारंवार तक्रारी येत असल्याने निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांनी याबाबतचा आढावा घेतला. तसेच तत्काळ लाभार्थ्यांना पगार अदा करण्यात यावे असे आदेश काढले. त्या अनुशंगाने जळगाव ग्रामीणमधील डिसेंबर २०१४ ते फेब्रुवारी २०१५ या दरम्यान दोन हजार ४८ ज्येष्ठ नागरिकांचे ३६ लाख ८६ हजार ४०० रुपये तसेच १९ विधवा महिलांचे ३४ हजार २०० रुपये जमा करण्यात आले आहे. तर मार्च ते एप्रिल २०१५ या दरम्यान दोन हजार ४८ लाभार्थ्यांचे २४ लाख ५७ हजार ६०० तर विधवा महिलांचे २२ हजार ८०० रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे.पाचोरा तालुक्यातील १२९० ज्येष्ठ नागरिक लाभार्थ्यांचे एप्रिल महिन्यातील सात लाख ७४ हजार रुपये तर चार विधवा महिलांचे मार्च व एप्रिल अशा दोन महिन्याचे ४८०० रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेली निराधारांची पगाराची रक्कम दिवाळीच्या काळात मिळणार असल्याने निराधार लाभार्थ्यांची दिवाळी गोड होणार आहे.