शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

राजाराम नगरात पाण्यासाठी पायपीट एका कुपनलिकेवर ७० घरांचे पाणी : मनपाची पाणी पुरवठा व्यवस्था नसल्याने जलसंकट

By admin | Updated: March 14, 2016 00:20 IST

जळगाव : कानळदा रस्त्यावरील राजाराम नगरात महापालिकेची स्वतंत्र पाणी पुरवठा करणारी यंत्रणा नसल्याने या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी रेल्वे स्टेशन, बौद्ध मंदिर, शिवाजी नगर, खडके चाळ या भागात पायपीट करावी लागत आहे. एका कुपनलिकेवर या भागातील ७० ते ७५ घरे अवलंबून आहेत.

जळगाव : कानळदा रस्त्यावरील राजाराम नगरात महापालिकेची स्वतंत्र पाणी पुरवठा करणारी यंत्रणा नसल्याने या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी रेल्वे स्टेशन, बौद्ध मंदिर, शिवाजी नगर, खडके चाळ या भागात पायपीट करावी लागत आहे. एका कुपनलिकेवर या भागातील ७० ते ७५ घरे अवलंबून आहेत.

तीन गृहनिर्माण सोसायटींची स्थापना
कानळदा रस्त्यावरील राजाराम नगराच्या जागेवर आकांक्षा गृहनिर्माण सोसायटी, अक्षय गृहनिर्माण सोसायटी व अक्षरा गृहनिर्माण सोसायटीची २००७ मध्ये स्थापना केली. या सोसायटीत शिक्षक, पोलीस, ग्रामसेवक यांच्यासह शासकीय नोकर व काही खाजगी व्यावसायिकांना प्लॉट देण्यात आले.

सहा ते १५ लाखांपर्यंत घरे
शासकीय कर्मचार्‍यांसाठी तयार करण्यात आलेल्या या गृहनिर्माण सोसायटीतील सदस्यांना सुरुवातीला चार लाख ३१ हजार रुपये भरण्यास सांगण्यात आले. त्यानंतर कर्ज प्रकरणी झालेले नसल्याने पुन्हा दीड लाखांची रक्कम भरण्यास सांगितले. सरकारी नोकरी नसलेल्या नागरिकांना तब्बल १४ ते १५ लाख रुपये मोजून घर दिले असल्याची माहिती रहिवाशांनी दिली.

पाणी व वीजसाठी स्वतंत्र रक्कम
गृहनिर्माण सोसायटीच्या सदस्यांना घर देतेवेळी पिण्याचे पाणी व वीज याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. त्याबदल्यात २५ हजार रुपयांची जादा रक्कम प्रत्येक कुटुंबाकडून घेतली. मात्र प्रत्यक्षात या भागातील नागरिकांना ना वीज मिटर मिळाले ना पिण्याचे पाणी.

रहिवाशांचे हाल
गृहनिर्माण सोसायटीच्या पदाधिकार्‍यांनी सुरुवातील या भागात एक बोअरींग करून दिली आहे. या बोअरींगवरून राजाराम नगरातील ७० ते ७५ कुटुंब पाणी भरत आहेत. त्यातच पिण्याचे पाणी हे शिवाजी नगर, रेल्वे स्टेशन, बौद्ध मंदिर, खडके चाळ या भागातून आणत आहेत. काही कुटुंबांनी स्वतंत्र बोअरींग करीत पाण्याची व्यवस्था केली आहे.

ग्रामपंचायतीची टोलवाटोलवी
राजाराम नगर हा भाग आव्हाणे ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत आहे. या भागात मनपाची स्वतंत्र पाणी पुरवठा यंत्रणा नसल्याने नागरिकांनी आव्हाणे ग्रामपंचायतीला विनंती करून पिण्याचे पाणी व गटारी उपलब्ध करून द्याव्या अशी विनंती केली. मात्र आव्हाणे ग्रामपंचायतीने अद्याप दखल घेतलेली नाही. मनपाने वाघ नगराच्या धर्तीवर या भागापर्यंत पाईपलाईन करावी अशी अपेक्षा नागरिकांची आहे.