शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

देशातील 70 टक्के एटीएम मशिनला धोका

By admin | Updated: May 14, 2017 11:41 IST

देशातील जवळपास 70 टक्के एटीएम मशिनमध्ये सॉफ्टवेअर अपडेट करण्यात आलेलं नाही त्यामुळे हे एटीएम कधीही सायबर हल्ल्याचे शिकार होऊ शकतात.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 14 - देशातील जवळपास 70 टक्के एटीएम मशिनमध्ये  सॉफ्टवेअर अपडेट करण्यात आलेलं नाही त्यामुळे हे एटीएम कधीही सायबर हल्ल्याचे शिकार होऊ शकतात. केंद्र सरकारने याबाबत अलर्ट जारी केला आहे. 
 
देशातील 70 टक्के एटीएममध्ये  मायक्रोसॉफ्टने सपोर्ट काढून घेतलेल्या विंडोज XP चा वापर होतो. 2014 पासून मायक्रोसॉफ्टने विंडोज XP साठी सुरक्षा आणि इतर सुविधा पुरवण्याचे बंद केले आहे. यामुळे हे एटीएम सहज सायबर हल्ल्याचे बळी ठरू शकतात अशी परिस्थिती आहे. रिझर्व्ह बँक, इतर बँका, शेअर बाजार आणि आर्थिक व्यवहार करणाऱ्या महत्त्वाच्या इतर वित्तीय संस्थांना केंद्र सरकारने अॅलर्ट जारी केला आहे. नवभारत टाइम्सने याबाबत वृत्त दिलं आहे. 
 
शुक्रवारी जगभरातील 99 देशांमध्ये सायबर हल्ला झाला होता. भारताचाही यात समावेश होता. आंध्र प्रदेश पोलिसांचे 102 कम्प्युटर्स सायबर हल्लेखोरांनी हॅक केले होते.  विजयवाडा, तिरुपती, विशाखापट्टणम आणि श्रीकाकुलम येथील पोलिसांचे सर्व्हर फ्रान्समधून हॅक करण्यात आले होते. दिलासादाय म्हणजे केंद्रीय गृहमंत्रालय आणि इतर राज्यांच्या मदतीने आंध्र पोलिसांनी आपला डेटा सुरक्षित ठेवणं शक्य झालं होतं.