शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
4
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
5
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
6
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
7
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
8
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
9
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
10
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
11
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
12
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
13
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
14
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
15
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
16
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
17
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
18
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
19
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
20
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!

गुलमर्गमध्ये केबल कार टॉवर कोसळल्यानं 7 पर्यटकांचा मृत्यू

By admin | Updated: June 25, 2017 19:17 IST

गुलमर्गमध्ये रविवारी केबल कार टॉवर कोसळल्यानं 7 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे

ऑनलाइन  लोकमतजम्मू-काश्मीर, दि. 25 - गुलमर्गमध्ये रविवारी केबल कार टॉवर कोसळल्यानं 7 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. जोरदार वारे वाहत असल्यामुळे केबल कारचा टॉवर ढासळला आहे. या घटनेनंतर बचावकार्य राबवण्यात आलं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मृतांमधील 4 लोक हे दिल्लीतल्या शालीमार बाग येथे राहणारे आहेत. सर्व एकाच परिवारातील सदस्य आहेत. तसेच एका मृतकांची ओळख स्थानिक नागरिक असल्याची पटवण्यात आली आहे.मृतांमध्ये दिल्लीतल्या जयंत अंद्रासकर, त्यांची पत्नी मानसी आणि मुलगी अनाघा आणि जान्हवी समावेश आहे. तसेच त्यांचा गाइड मुख्यात अहमद गनीचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. इतर मृतांची ओळख अद्याप पटवण्यात आली नाही. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनीही या घटनेवर दुःख व्यक्त केलं आहे. तसेच उमर यांनी प्रशासनावरही निशाणा साधला आहे. सोसाट्याचे वारे वाहत असताना केबल कार बंद का केली नाही, असा प्रश्न उमर यांनी उपस्थित केला आहे. ते ट्विट करत म्हणाले, गुलमर्गमधून हृदयद्रावक घटना समोर येते आहे. एका कुटुंबाच्या सुट्ट्यांचा अंत कशा प्रकारे झाला. सहानुभूती देणं पुरेसं नाही. गुलमर्गमधली केबल कार ही पर्यटकांच्या आवडीची गोष्ट आहे. गुलमर्गमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. गुलमर्गमधले हिवाळी खेळ लोकांना खूप आवडतात. जगभरातून लोक जम्मू-काश्मीरमध्ये येत असतात. मात्र पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय असलेल्या केबल कारचा टॉवर पडल्याने 7 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यात अनेक लोक जखमी झाल्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.