शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

६.६ टक्केही राहणार नाही विकासाचा दर

By admin | Updated: January 31, 2017 05:14 IST

अर्थमंत्री अरुण जेटली उद्या, मंगळवारी देशाचे आर्थिक सर्व्हेक्षण संसदेत सादर करणार आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेची गती काय असेल ते यातून समजणार आहे. पण, काँग्रेसने

- शीलेश शर्मा, नवी दिल्ली

अर्थमंत्री अरुण जेटली उद्या, मंगळवारी देशाचे आर्थिक सर्व्हेक्षण संसदेत सादर करणार आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेची गती काय असेल ते यातून समजणार आहे. पण, काँग्रेसने सोमवारीच याबाबत ९० पानांचा समीक्षा अहवाल सादर केला आहे आणि देशाच्या अर्थव्यवस्थेची दशा आणि दिशा योग्य नसल्याचे संकेत दिले. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग तर म्हणाले की, मोदी सरकार ज्या दिशेने जात आहे ते पाहता विकासाचा दर ६.६ टक्केही राहणार नाही. माजी अर्थमंत्री चिदंबरम यांनी म्हणाले की, आम्ही देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत समाधानी नाही. यूपीएच्या काळात जीडीपीचा सरासरी दर ७.५ टक्के होता. मोदी सरकारने चांगले काम करावे. त्यात आम्हालाही आनंद आहे. पण, देशाचे काही प्रश्न आहेत. त्याचे उत्तर सरकारने द्यायला हवे. देशात रोजगार कुठे आहेत? सरकार काय करत आहे? जुलै, आॅगस्ट आणि सप्टेंबरमध्ये फक्त ७७ हजार रोजगार निर्मिती झाली. सरकारचे आश्वासन काय होते? आमची क्रेडिट ग्रोथ आतापर्यंतच्या सर्वात नीचांकावर आहे. ती फक्त पाच टक्के आहे. देशाच्या इतिहासात असे कधीच झाले नाही. खासदार राजीव गौडा यांनी स्पष्ट केले की, रस्ते निर्मितीबाबत गडकरी जे दावे करत आहेत, ते खोट्या माहितीवर आधारित आहेत. रेल्वे अपघातांनी मागचे रेकॉर्ड तोडले आहेत. उद्योग व्यवस्थित सुरू नाहीत. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन होत आहे. ह्यूमन कॅपिटलचा धोका कायम आहे. शिक्षणातील गुंतवणुकीबाबत गंभीर परिस्थिती आहे.आरोग्य सेवा नसल्यात जमा आहेत. उरलीसुरली कसर नोटाबंदीने भरुन काढली आहे. मनरेगाच्या निधीत जर सरकारने कपात केली तर परिस्थिती आणखी बिकट होईल. कारण, ६० टक्के जनतेने नोटाबंदीमुळे पलायन केले आहे. हीच परिस्थिती सामाजिक सुरक्षेच्याबाबतीत आहे. यातही कपात केली तर पायावर कुऱ्हाड मारुन घेण्यासारखे होईल.गरज नसताना प्रयत्नयूपीए सरकारच्या काळात शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले होते. त्याचे समर्थन करत चिदंबरम म्हणाले की, जगात आर्थिक मंदी असतानाही शेतकऱ्यांबाबत घेण्यात आलेला हा निर्णय काळाची गरज होता. तथापि, अनेक तर्क करून त्यांनी बीसीटीटीला आजच्या काळात अप्रासंगिक असल्याचे सांगितले. जेव्हा याची गरज होती तेंव्हा भाजपने विरोध केला आणि आज गरज नसताना भाजप सरकार यासाठी प्रयत्न करत आहे.