शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

६६ वस्तू व सेवांच्या करात घट

By admin | Updated: June 12, 2017 00:09 IST

जीएसटी कौन्सिलच्या रविवारी झालेल्या बैठकीत ६६ उत्पादनांवरील वस्तू व सेवांवरील कराचा दर कमी करण्याचा, वर्षाकाठी ७५ लाखांपर्यंतची उलाढाल करणारे छोटे व्यापारी

सुरेश भटेवरा । लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : जीएसटी कौन्सिलच्या रविवारी झालेल्या बैठकीत ६६ उत्पादनांवरील वस्तू व सेवांवरील कराचा दर कमी करण्याचा, वर्षाकाठी ७५ लाखांपर्यंतची उलाढाल करणारे छोटे व्यापारी, लघुउद्योग व रेस्टॉरंट्सना नाममात्र एकत्रित कर योजनेचा लाभ देत जीएसटीच्या कक्षेबाहेर ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे, ही माहिती बैठकीनंतर अर्थमंत्री जेटलींनी पत्रपरिषदेत दिली.वर्षाकाठी ७५ लाखांची उलाढाल करणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांना १ टक्का, लघुउद्योगांना २ टक्के व रेस्टॉरंट्स चालवणाऱ्यांना एकत्रित ५ टक्के कर भरून स्वत:ला जीएसटीच्या कक्षेबाहेर ठेवण्याची विशेष मुभा जीएसटी कौन्सिलने दिली आहे. जीएसटी कौन्सिलकडे १३३ वस्तूंवरील कराचे दर कमी करण्याची मागणी होती त्यापैकी ६६ वस्तूंवरील कर कमी करण्याचा निर्णय कौन्सिलने घेतल्याची माहिती देतांना, महत्त्वाच्या वस्तू व त्याचे कमी करण्यात आलेले दर यांची यादीच अर्थमंत्र्यांनी पत्रपरिषदेत सादर केली.सॅनिटरी नॅपकिनवरील जीएसटी काढून टाकण्याची मागणी देशातल्या अनेक महिला संघटनांनी केली होती मात्र पूर्वीच्या निर्णयात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे अर्थमंत्री म्हणाले.मल्टिप्लेक्समधील तिकिटे आणखी महागणार१चित्रपट तिकिटांची वर्गवारी दोन गटात करण्यात आली आहे, असे स्पष्ट करीत अर्थमंत्री म्हणाले, प्रत्येक राज्यात करमणूक कराचे दर सध्या वेगवेगळे आहेत. ते २८ टक्क्यांपासून ११0 टक्क्यांपर्यंत आहेत. करमणूक कराची जागा आता जीएसटी घेणार असल्याने नव्या दरानुसार १00 रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या सिनेमा तिकिटांवर २८ टक्के व १00 रुपयाच्या आतील रकमेच्या तिकिटावर १८ टक्के कर आकारला जाईल.२साहजिकच या निर्णयामुळे मल्टिप्लेक्सपेक्षा सिंगल स्क्रीन सिनेमा थिएटरमधे चित्रपट पाहणे यापुढे स्वस्त पडणार आहे. भारतीय भाषांतील चित्रपटांना जीएसटीतून वगळण्याची मागणी अनेक राज्यांनी केली होती, मात्र केंद्राकडून त्यात कोणतीही सूट दिली जाणार नाही हे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले.

शिक्षण, आरोग्याला जीएसटीबाहेरच ठेवले आरोग्य सेवांमधे यंत्रसामग्री, शस्त्रक्रियेसाठी लागणारी उपकरणे, स्टेंटस, व फार्मा क्षेत्रावर सध्या व्हॅट आकारला जातो. आयआयटी व आयआयएमसारख्या उच्चशिक्षणाच्या फीवर सध्या सर्व्हिस टॅक्स आकारला जातो. आता शिक्षण व आरोग्य सेवा क्षेत्राला जीएसटीच्या कक्षेबाहेर ठेवून करमुक्त करण्याचा निर्णय जीएसटी कौन्सिलने घेतला आहे.पुढील बैठकीत काय ठरणार?जीएसटी कौन्सिलची पुढची बैठक १८ जून रोजी आहे. त्यात लॉटरीवरील कर, ई-बिलांवरील कर, इत्यादींवर चर्चा होईल, त्याचबरोबर सॅनिटरी टॉवेल्सवरील कराचाही पुनर्विचार होण्याची शक्यता आहे, असे सूत्रांकडून समजले.