शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

६५,२५0 कोटींचे काळे धन घोषित

By admin | Updated: October 2, 2016 02:52 IST

देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या उत्पन्न प्रकटीकरण योजनेत, ६५ हजार २५0 कोटी रुपयांचे उत्पन्न करदात्यांनी जाहीर केले असून, त्यापोटी सरकारला

- हरीश गुप्ता,  नवी दिल्ली देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या उत्पन्न प्रकटीकरण योजनेत, ६५ हजार २५0 कोटी रुपयांचे उत्पन्न करदात्यांनी जाहीर केले असून, त्यापोटी सरकारला तब्बल ३0 हजार कोटी रुपयांचा कर मिळणार आहे. या योजनेत ६४,२७५ घोषणापत्रे आयकर विभागाला सादर करण्यात आली आहेत.चार महिने चाललेल्या या योजनेची मुदत ३0 सप्टेंबर रोजी संपली. आश्चर्याची बाब, शेवटच्या तीन दिवसांत योजनेचा लाभ घेण्यासाठी कर चुकविणाऱ्यांनी प्रचंड गर्दी केली होती. अघोषित उत्पन्नावर ४५ टक्के कर लावण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले होते. या योजनेला मिळालेल्या यशाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केले आहे. त्यांनी अर्थमंत्री अरुण जेटली आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे.मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असली, तरी हैदराबादमधून सर्वाधिक काळा पैसा बाहेर निघाला आहे. अरुण जेटली यांनी योजनेचा तपशील देताना योजनेच्या यशाबाबत समाधान व्यक्त केले. योजनेसाठी ठरावीक रकमेचे उद्दिष्ट ठेवले गेले नव्हते, असे ते म्हणाले. तथापि, सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेतून १ लाख कोटी रुपयांचे उत्पन्न घोषित होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, ती पूर्णत्वास गेली नाही. जेटली यांनी सांगितले की, अंतिम आकडे बदलू शकतात. कारण काही घोषणापत्रांची छाननी आयकर विभागाकडून अजूनही सुरू आहे. योजनेत जाहीर झालेल्या ६५ हजार २५0 कोटी रुपयांत ८ हजार कोटी रुपये एचएसबीसीअंतर्गत घोषित झाले आहेत. तीन टप्प्यांत करभरणाया योजनेत जाहीर केलेल्या उत्पन्नावरील कर सप्टेंबर २0१७ पर्यंत तीन टप्प्यांत भरावयाचा आहे. पहिला २५ टक्क्यांचा हप्ता नोव्हेंबर २0१६ पर्यंत, २५ टक्क्यांचाच दुसरा हप्ता पुढील वर्षी ३१ मार्च २0१७ पर्यंत आणि उर्वरित रक्कम ३0 सप्टेंबर २0१७ पर्यंत भरावी लागेल. गेल्या वर्षी सरकारने अशीच योजना जाहीर केली होती. तिच्यातून ४,१६४ कोटींचे उत्पन्न घोषित झाले होते. त्या आधी १९९७ मध्ये तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी ३0 टक्के करासह व्हीडीआयएस योजना जाहीर केली होती. तिच्यातून ९,७४५ कोटींचे उत्पन्न घोषित झाले होते.