शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

65 वर्षीय साधूवर महिलेने केला बलात्कार

By admin | Updated: May 28, 2017 09:45 IST

पुरुषाने महिलेवर बलात्कार केल्याच्या घटना तुम्ही वाचल्या असतील. पण राजस्थानमध्ये एका महिलेने 65 वर्षीय साधूवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमतजयपूर, दि. 28 - पुरुषाने महिलेवर बलात्कार केल्याच्या घटना तुम्ही वाचल्या असतील. पण राजस्थानमध्ये एका महिलेने 65 वर्षीय साधूवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. 65 वर्षीय पीडित साधूने याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत साधूने महिलेवर बलात्काराचा आरोप केला असून आपली फसवणुक आणि ब्लॅकमेल केल्याचा आरोपही केला आहे.प्राप्त माहितीनुसार, ही घटना राजस्थानातील बुंदी येथील पोलिस ठाणे परिसरातील आहे. येथील गावात राहणाऱ्या एका 65 वर्षीय साधूने पोलिसांत तक्रार दिली आहे की, गावात राहणाऱ्या एका महिलेने आपल्यासोबत बलात्कार केला. तसेच, लैंगिक अत्याचाराच्या आरोपात अडकविण्याची धमकीही दिली. धमकी देऊन संबंधीत महिलेने आपल्याकडून 3 लाख रूपयेही लाटले आहेत. पीडित साधूने म्हटले आहे की, आरोपी महिलेच्या पतीने आपल्याकडून 20 हजार रूपये उधार घेतले होते. पैसे परत करण्याची मुदत संपल्यावर आपण त्या महिलेच्या पतीकडे पैसे परत मागितले. तेव्हा ती महिला आणि तिच्या पतीने संगनमताने आपल्यासोबत गैरकृत्य केले. तसेच, आपल्याला बलात्काराच्या आरोपाखाली अडकविण्याची धमकीही दिली. तसेच, मानसीक छळ करत दोघांनी मिळून आपल्याकडून 3 लाख रूपयेही लाटले. यानंतरही दोघा पती-पत्नीचे मन भरले नाही. त्यांनी माझ्याकडे आणखी 2 लाख रूपयांची मागणी करत असल्याचे साधूचे म्हणने आहे. दरम्यान, पती-पत्नीच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून अखेर आपण पोलिसांत तक्रार दिल्याचे साधू सांगतो. घटनेचा पुरावा म्हणून साधूने पोलिसांना मोबाईल फोनचे रेकॉर्डींगही दिले आहे. पोलिसांनी गुन्हा नोंद करून घेतला आहे. तसेच, आरोपी महिलेला ताब्यातही घेतले आहे. महिलेचा पती अद्याप फरार आहे. पोलिस पूढील तपास करत आहेत. या वृत्ताची माध्यमातही चर्चा आहे.