गुन्हे शाखेने पकडला ६५ हजाराचा गांजा
By admin | Updated: February 11, 2015 23:47 IST
गुन्हे शाखेने पकडला ६५ हजाराचा गांजा
गुन्हे शाखेने पकडला ६५ हजाराचा गांजा
गुन्हे शाखेने पकडला ६५ हजाराचा गांजानागपूर : गुन्हे शाखेने शहरात अवैधरीत्या गांजा बाळगणाऱ्या आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ६५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्हे शाखेने आरोपी अयाज अहमद ऊर्फ अय्या (३४) रा. मोमीनपुरा, मोहम्मद जमील (४२) रा. अन्सारनगर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २ किलो ५०० ग्रॅम गांजा किंमत २५ हजार जप्त करून वाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पहलवान बाबा चौक, अन्सारनगर येथे मोहम्मद जमील अहमद वल्द अमीर रियाजुद्दीन (५५) रा. अन्सारनगर याच्याजवळून ४ किलो गांजा किंमत ४० हजार आणि रोख ७०० रुपये जप्त केले. .............