शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

यूपीत ६१ टक्के मतदान

By admin | Updated: February 20, 2017 01:20 IST

निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यात रविवारी ६१.१६ टक्के मतदान झाले आहे. किरकोळ घटना वगळता या १२ जिल्ह्यांच्या ६९ मतदारसंघात

लखनौ : निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यात रविवारी ६१.१६ टक्के  मतदान झाले आहे. किरकोळ घटना वगळता या १२ जिल्ह्यांच्या ६९ मतदारसंघात शांततेत मतदान झाल्याचे वृत्त आहे. मुख्य निवडणूक अधिकारी टी. व्यंकटेश यांनी ही माहिती दिली. राज्यात तिसऱ्या टप्प्यात फर्रखाबाद, हरदोई, कन्नौज, मैनपुरी, इटावा, औरैया, कानपूर ग्रामीण, कानपूर, उन्नाव, लखनौ, बाराबंकी आणि सीतापूर जिल्ह्यात ६९ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६१.१६ टक्के मतदान झाले आहे. सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान सुरु होते. तथापि, मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तिसऱ्या टप्प्यात १०५ महिलांसह एकूण ८२६ उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. पहिल्या टप्प्यात ६४ तर दुसऱ्या टप्प्यात ६५ टक्के मतदान झाले होते. इटावात जसवंतनगर मतदारसंघात कतैयापुरा येथे मतदारांना धमकविण्याची तक्रार होती. त्यानंतर येथे दाखल झालेले सपाचे उमेदवार शिवपाल सिंह यादव यांच्या वाहनांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. जसवंतनगरमधील सपाचे नगराध्यक्ष राहुल गुप्ता व त्यांचे समर्थक मतदान केंद्राजवळ बसले होते. यावरुन त्यांची पोलिसांशी बाचाबाची झाली. त्यामुळे पोलिसांनी या नेत्यांवर कथित लाठीमार केला.नेत्यांचे मतदान २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत सपाने ६९ पैकी ५५ जागा मिळविल्या होत्या. बसपाला सहा, भाजपला पाच तर काँंग्रेसला दोन जागा मिळाल्या होत्या. अपक्षाला एक जागा मिळाली होती. दरम्यान, केंद्रीय गृह मंत्रीराजनाथ सिंह, बसपाच्या प्रमुख मायावती यांनी लखनौ मतदारसंघात मतदान केले. तर, मुख्यमंत्री अखिलेश यादव व मुलायम सिंह यादव यांनी इटावात सैफई येथे मतदान केले. तिसऱ्या टप्प्यात जे प्रमुख उमेदवार होते त्यात मुलायम सिंह यांचे भाऊ शिवपाल सिंह यादव, मुलायम सिंह यांची सून अपर्णा, विद्यमान आमदार रीता बहुगुणा जोशी, कॅबिनेट मंत्री अरविंद सिंह गोप, राज्यमंत्री फरीद महफूज किदवई यांचा समावेश आहे. राज्यात पुढील टप्प्यातील मतदान २३ व २७ फेब्रुवारी, ४ व ८ मार्च रोजी होणार आहे. मतमोजणी ११ मार्च रोजी होईल.