शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

29 नॅनो उपग्रहांच्या प्रक्षेपणातून इस्त्रोने कमावले 61 लाख युरो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 14:14 IST

इस्त्रोची व्यावसायिक शाखा असलेल्या अँट्रीक्सने 14 देशांच्या 29 नॅनो उपग्रहांच्या प्रक्षेपणातून 61 लाख युरोंची कमाई केली आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 21 - भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोची व्यावसायिक शाखा असलेल्या अँट्रीक्सने 14 देशांच्या 29 नॅनो उपग्रहांच्या प्रक्षेपणातून 61 लाख युरोंची कमाई केली आहे. मागच्या चारवर्षात अँट्रीक्सने परदेशी उपग्रहाच्या प्रक्षेपणातून 1 कोटी 57 लाख युरोची कमाई केली आहे. 2017 सालच्या पहिल्या सहा महिन्यात इस्त्रोने 130 उपग्रहांचे प्रक्षेपण केले आहे. इस्त्रोने जे परदेशी उपग्रह प्रक्षेपित केले ते आकाराने छोटे होते. 
 
पुढच्या काहीवर्षात इस्त्रो उपग्रहांच्या लाँचिंगसाठी अँट्रीक्सला दोन स्वतंत्र प्रक्षेपक उपलब्ध करुन देईल असा विश्वास इस्त्रोचे चेअरमन एएस किरण कुमार यांनी व्यक्त केला. सध्या भारतीय उपग्रहांचे प्रक्षेपण ही इस्त्रोची पहिली प्राथमिकता आहे. त्यामुळे प्रक्षेपकांमध्ये जी अतिरिक्त जागा उरते ती परदेशी उपग्रहांसाठी राखून ठेवली जाते. याच अतिरिक्त जागेतून अँट्रीक्स नफा कमवत आहे.  
 
इस्त्रोने अलीकडे कार्टोसॅट-2 उपग्रहाचे प्रक्षेपण केले. यावेळी प्रक्षेपकामध्ये कार्टोसॅट मुख्य प्रवाशी तर, अन्य परदेशी उपग्रह सहप्रवासी होते. ऑस्ट्रीया, चिली, बेल्जियम, फ्रान्स, फिनलँड, झेक प्रजासत्ताक, जर्मनी, इटली, अमेरिका, लाटीवा, स्लोव्हाकिया आणि यूके या देशांचे नॅनो उपग्रह होते. 
 
आणखी वाचा 
लवकरच इस्त्रो रॉकेलला इंधन बनवून करणार उपग्रहाचे प्रक्षेपण
VIDEO : इस्त्रोच्या ""बाहुबली""ने पाठवला भन्नाट सेल्फी !
इस्रोचे सामर्थ्य; प्रगत देशांना धडकी
 
2013 मध्ये परदेशी उपग्रहाच्या लाँचिंगमधून अँट्रीक्सने 69 लाख युरोंची कमाई केली. परदेशी उपग्रहाच्या लाँचिंगमधून सरासरी 10 ते 20 टक्के महसूल मिळतो. जवळपास 80 टक्के महसूल दुस-या स्त्रोतांमधून मिळतो. सॅटलाइट कम्युनिकेशनच्या बिझनेसमधून सर्वाधिक फायदा मिळतो. 
 
लवकरच इस्त्रो रॉकेलला इंधन बनवून करणार उपग्रहाचे प्रक्षेपण
भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रो सेमी क्रायोजेनिक इंजिनच्या निर्मितीवर काम करत असून, या इंजिनमध्ये पर्यावरणपूरक रॉकेलचा इंधन म्हणून वापर करण्यावर शास्त्रज्ञ काम करत आहेत. द्रवरुप इंधनापेक्षा रॉकेल हलके असल्यामुळे सामान्य तापमानाला ते साठवून ठेवता येऊ शकते. सध्या उपग्रह प्रक्षेपणासाठी वापरल्या जाणा-या रॉकेटच्या इंजिनमध्ये द्रवरुप हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या मिश्रणाचा इंधन म्हणून वापर केला जातो. हे इंधन गोठवून टाकणा-या  (-253) डीग्री सेल्सिअस तापमानाला साठवून ठेवावे लागते.