शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

61 टक्के दिल्लीकर केजरीवालांच्या कामगिरीवर नाखूश : सर्व्हे

By admin | Updated: February 9, 2017 17:32 IST

येत्या 14 फेब्रुवारीला दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांच्या आप सरकारला दोन वर्षे पूर्ण होणार आहेत. सर्वसामान्यांना चांगले

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. 9 -  येत्या 14 फेब्रुवारीला दिल्लीतील  अरविंद केजरीवाल यांच्या आप सरकारला दोन वर्षे पूर्ण होणार आहेत. सर्वसामान्यांना चांगले सरकार देण्याचे आश्वासन देऊन सत्तेत आलेले केजरीवाल स्थानिक मुद्यांपासून राष्ट्रीय प्रश्नांपर्यंत सर्वांवर हिरिरीने आपले मत मांडतात. मात्र केजरीवाल यांच्या दोन वर्षांच्या कामकाजाबाबत तब्बल 61 टक्के  दिल्लीकर मात्र नाखूश असल्याचे एका सर्व्हेतून समोर आले आहे. 
संध्या टाइम्सने केलेल्या या सर्व्हेमध्ये  61 टक्के दिल्लीकरांनी सांगितले की ते केजरीवाल सरकारच्या कामगिरीवर नाखूश आहेत. तर 34 टक्के लोकांनी दिल्ली सरकारची कामगिरी समाधानकारक असल्याचे म्हटले आहे. मात्र 4 टक्के लोकांनी या प्रश्नावर काहीही मत नोंदवलेले नाही. संध्या टाइम्सने 550 लोकांशी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संवाद साधत हा सर्व्हे केला आहे. या सर्वेत भ्रष्टाचार, जनलोकपाल, केंद्र सरकारसोबतचे विवाद आणि महिला संरक्षण या अनुषंगाने प्रश्न विचारण्यात आले होते. 
एकीकडे आप सरकारची  लोकप्रियता कमी झालेली असतानाच  केजरीवाल यांच्या लोकप्रियतेतही कमालीची घट झाली आहे. केजरीवाल आणि भाजपाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांना मुख्यमंत्रीपदारचे उमेदवार म्हणून समसमान पसंती मिळाली आहे. दोघांनाही प्रत्येकी 31.64 टक्के मतदारांनी पसंती दर्शवली आहे. तर काँग्रेसच्या अजय माकन यांना 18 टक्के मतदारांनी पसंती दर्शवली आहे.  तसेच जनलोकपाल लागू करण्यात आणि भ्रष्टाचार कमी करण्यात केजरीवाल सरकार अपयशी ठरल्याचे मतही बहुसंख्य मतदारांनी नोंदवले आहे.